Imraan Khan: अभिनेता आमिर खानचा (Aamir Khan) भाचा इमरान खान (Imraan Khan) हा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. इमरान त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे  चर्चेत होता. इमरान आणि अवंतिका मलिक यांनी घटस्फोट घेतला आहे, असं म्हटलं जात आहे. आता इमरानचं नाव एका दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत जोडलं जात आहे. नुकताच अभिनेत्री लेखा वॉशिंग्टन (Lekha Washington) आणि इमरानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे इमरान हा लेखाला डेट करत आहे का? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. 


कीर्ती खरबंदाच्या वाढदिवसाच्या पार्टीत  इमरान आणि लेखा हे एकत्र स्पॉट झाले. इमरान आणि लेखा यांच्या व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे की, हे दोघे फोटोग्राफर्स समोर फोटोसाठी पोज देतात. त्यानंतर ते एकाच कारमध्ये बसून निघून जातात. इमरान आणि लेखा हे दोघेही बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. या दोघांनी 'मटरू की बिजली का मन डोला' या चित्रपटात एकत्र काम केले होते.







लेखा वॉशिंग्टननं तमिळ आणि तेलुगू भाषेतील चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तर 2008 मध्ये प्रदर्शित झालेल्या  'जाने तू... या जाने ना' या चित्रपटामधून इमरान खाननं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानं ‘एक मैं और एक तू’, ‘वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई दोबारा’, ‘गोरी तेरे प्यार में’, ‘मेरे ब्रदर की दुल्हन’ आणि ‘देल्ही बेली’ या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. इमरान खानचे चित्रपट बॅक टू बॅक फ्लॉप झाले, नंतर इमराननं चित्रपटांमधून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला.


अवंतिका मलिक आणि इमरान खान यांनी 2011 मध्ये लग्नगाठ बांधली. त्यानंतर 2014 साली त्या दोघांना कन्यारत्न प्राप्त झाले. त्यांनी मुलाचे नाव इमारा असं ठेवलं. नंतर अवंतिका आणि इमरान या  दोघांमध्ये मतभेद  निर्माण झाले.  काही महिन्यांपूर्वी अवंतिका आणि इमरान यांच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण झाला, अशी चर्चा सोशल मीडियावर सुरु होती. 2019 मध्ये अवंतिका ही इमरानला सोडून तिच्या आई- वडिलांकडे राहायला गेली.  


वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 


Imran Khan: इमरान खान पुन्हा पडलाय प्रेमात? दाक्षिणात्य अभिनेत्रीसोबत जोडलं जातंय नाव, व्हायरल फोटोमुळे चर्चेला उधाण