IMDb 2022 Most Popular Indian Stars of 2022: IMDb या चित्रपट, टीव्ही आणि सेलिब्रिटी कंटेंटवर आधारित जगातल्या सर्वांत प्रसिद्ध स्रोताने 2022 मधील सर्वाधिक प्रसिद्ध भारतीय कलाकारांची घोषणा केली आहे. IMDb वर जवळपास 20 कोटी विजिटर्स महिन्याला येतात. या विजिटर्सच्या पेज व्ह्यूजच्या आधारे IMDb ने ही टॉप-10 कलाकारांची निवड केली आहे. द ग्रे मॅन आणि थिरुचित्रम्बलम या हिट चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका साकारणारा धनुष (Dhanush) हा या यादीमध्ये सर्वोच्च स्थानी आहे. तस बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. जाणून घेऊयात संपूर्ण यादी- 


IMDb च्या रिसर्चनुसार, 2022 मधील सर्वाधिक प्रसिद्ध भारतीय कलाकार-
1. धनुष
2. आलिया भट्ट
3. ऐश्वर्या राय बच्चन
4. राम चरण तेजा
5. समंथा रूथ प्रभू
6. ह्रतिक रोशन 
7. कियारा अडवानी
8. एन. टी. रामा राव ज्यु
9. अल्लु अर्जुन
10. यश


2022 ची IMDb टॉप 10 सर्वाधिक प्रसिद्ध भारतीय कलाकारांच्या यादीमध्ये असे कलाकार आहेत जे 2022 मध्ये IMDb च्या साप्ताहिक रँकिंगमध्ये सातत्याने सर्वोच्च स्थानी राहिले होते.  जगभरातून IMDb वर दर महिन्याला येणा-या 20 कोटी विजिटर्सच्या पेज व्ह्यूवर हे रँकिंग आधारित आहे.


जगभरातील लोक सिनेमा, वेबसिरीज आणि कलाकारांबद्दल जाणून घेण्यासाठी IMDb वर येतात आणि भारतीय कलाकारांची आमची टॉप 10 यादी ही जागतिक प्रसिद्धी निर्धारित करण्याचा आणि करिअरमधील मुख्य टप्पे आणि लक्षवेधी क्षण ओळखण्याचा मापदंड ठरली आहे,” असे IMDb इंडियाच्या प्रमुख यामिनी पतोडिया यांनी सांगितलं.


IMDb ला दिलेल्या मुलाखतीमध्ये आलिया भट्टने या वर्षीच्या यादीमध्ये तिचा समावेश झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. “2022 हे माझ्यासाठी खास वर्ष आहे. या वर्षी रिलीज झालेल्या माझ्या चित्रपटांना प्रेक्षकांनी दिलेल्या प्रेमाबद्दल मी नेहमी त्यांची ऋणी राहीन. IMDb हे लोकांच्या मनामधील भावना दर्शवणारे माध्यम आहे आणि मला आशा आहे की, मी‌ जोपर्यंत कॅमेरासमोर असेन, तोपर्यंत मी प्रेक्षकांचे मनोरंजन करत राहीन.” आलियाचे आरआरआर, गंगूबाई काठियावाडी आणि ब्रह्मास्त्र हे चित्रपट 2022 मध्ये प्रदर्शित झाले. 


वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 


Entertainment News Live Updates 7 December : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!