Namra Qadir: एका व्यावसायिकाला हनी ट्रॅपमध्ये अडकवून त्याची लाखो रुपयांची फसणुकीचा आरोप नामरा कादिरवर (Namra Qadir) करण्यात आला आहे. गुरुग्राम पोलिसांनी प्रसिद्ध युट्यूबर नामरा कादिरला अटक केली आहे. पोलीस सध्या तिची चौकशी करत आहे. नामरा कादिरला सोमवारी दिल्लीतून अटक करून दंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले, तिला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासात हे समोर आलं आहे की, नामरा ही विवाहित असून ती एका मुलाची आई आहे. नामर कादीरचा पती विराट बेनिवाल सध्या फरार आहे. त्याच्या शोधासाठी छापेमारी सुरू असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
नामरावर आरोप आहे की, तिनं तिच्या पतीसह गुरुग्रामच्या एका व्यावसायिकाची फसवणुक केली आहे. नामरानं त्या व्यवसायिकाला बलात्काराच्या खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकी दिली. 24 नोव्हेंबर रोजी पीडित व्यावसायिकाने सेक्टर 50 पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी नामराला अटक केली.
नामरा कादिरच्या विरुद्ध तक्रार करणाऱ्या व्यावसायिकाने तक्रारीत लिहिले आहे की, त्याची कामानिमित्त सोहना रोडच्या रेडिसन हॉटेलमध्ये नामरा कादिरसोबत भेट झाली होती. ती प्रसिद्ध युट्यूबर आहे त्याला माहित होते, तिचे व्हिडिओ त्याने पाहिले होते. तिनं विराट बेनिवालशी त्याची ओळख करून दिली जो एक यूट्यूबर आहे. तो तिचा त्याचा जवळचा मित्र आहे, असंही तिनं त्या व्यावसायिकाला सांगितलं. त्या व्यवसायिकाच्या फर्ममध्ये काम करण्यासाठी ती तयार झाली त्यानंतर तिनं त्याच्याकडून दोन लाख रुपये अॅडव्हान्स घेतले.
कोण आहे नामरा कादिर?
नामरा कादिर ही प्रसिद्ध युट्यूबर आहे. तिच्या युट्यूब चॅनला 6 लाख पेक्षा जास्त लोक फॉलो करतात. तसेच इन्स्टाग्रामवर तिला 2 लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: