Jitendra Awhad: बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार (Akshay Kumar) हा त्याच्या अभिनयानं नेहमी प्रेक्षकांचे मनोरंजन करतो. अक्षयच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघतात. आता लवकरच अक्षय वेडात मराठे वीर दौडले सात (Vedant Marathe Veer Daudale Saat) या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात अक्षय हा छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारणार आहे. नुकताच अक्षयनं एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. या व्हिडीओमध्ये अक्षय हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसत आहे. अनेक नेटकऱ्यांनी अक्षयनं शेअर केलेल्या व्हिडीओला कमेंट्स करुन त्याला ट्रोल केलं. तर काहींनी त्याचं कौतुक केलं आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी एक ट्वीट शेअर करुन वेडात मराठे वीर दौडले सात या चित्रपटातील अक्षयच्या लूकवर टीका केली आहे.
जितेंद्र आव्हाड यांचे ट्वीट
जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीटमध्ये लिहिलं, 'जर्मनी,पॅरिस, अमेरिका येथे संग्रहालयात असलेली ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिवकालीन चित्र आहेत. त्यावरुन शिवाजी महाराजांची साधारणत: आपल्याला कल्पना येते. चित्रपट येतोय... ‘वेडात मराठे वीर दौडले सात’. त्यामधील शिवाजी महाराज बघितल्यावर महाराष्ट्राला "वेड्यात" काढलं जातंय असं वाटतं.'जितेंद्र आव्हाड यांच्या ट्वीटनं अनेकांचे लक्ष वेधलं.
अक्षयनं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या लूकमध्ये दिसत आहे. व्हिडीओला अक्षयनं कॅप्शन दिलं, 'जय भवानी, जय शिवाजी'.
"वेडात मराठे वीर दौडले सात" या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केलं आहे. या चित्रपटात अक्षयसोबतच अभिनेता प्रवीण तरडे, हार्दिक जोशी, विशाल निकम, विराट मडके, सत्या मांजरेकर, जय दुधाणे, उत्कर्ष शिंदे हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत. हा चित्रपट मराठी, हिंदी आणि तेलगू भाषेत प्रदर्शित केला जाणार आहे.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
Akshay Kumar: छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत अक्षय कुमार; शेअर केला व्हिडीओ, नेटकरी म्हणाले...