Ileana D'cruz Delivered A Baby Boy : अभिनेत्री इलियाना डिक्रूज (Ileana D'cruz) आई झाली आहे. 1 ऑगस्ट 2023 रोजी इलियानाने एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. लेकाची पहिली झलक चाहत्यांसोबत शेअर करत तिने त्यांच्या नावाचीही घोषणा केली आहे. अभिनेत्रीने तिच्या लाडक्या लेकाचं नाव 'कोआ फिनिक्स डोलन' असं ठेवलं आहे. तसेच या गोड फोटोवर बाळाची जन्मतारीखही लिहिलेली आहे.


इलियानाने तिच्या लाडक्या लेकाचा म्हणजेच कोआ फिनिक्स डोलनचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत एक खास कॅप्शनही दिलं आहे. तिने लिहिलं आहे,"आमच्या लाडक्या लेकाचं या जगात स्वागत करताना खूप आनंद होत आहे. हा आनंद शब्दात व्यक्त करता येणार नाही". इलियानाच्या या पोस्टवर सेलिब्रिटींपासून चाहत्यांपर्यंत सर्वांनीच अभिनंदाचा वर्षाव केला आहे.






अभिनेत्रीने अद्याप मिस्ट्री मॅनबद्दल 


इलियानाने एका मुलाला जन्म दिला असला तरी तिने अद्याप त्याच्या वडिलांबाबत चाहत्यांना माहिती दिलेली नाही. पण जोडीदारासोबतचे फोटो मात्र तिने अनेकदा सोशल मीडियावर शेअर केले आहेत. अभिनेत्रीने सोशल मीडियावर तिच्या पार्टनरसोबतचे डेट नाईट फोटोही शेअर केले आहेत.  
इलियानाचा पार्टनर कोण आहे आणि तो काय करतो याबद्दल अभिनेत्रीने कोणताही खुलासा केलेला नाही.


इलियानाने 18 एप्रिल 2023 रोजी फोटो शेअर करत चाहत्यांना प्रेग्नंट असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर अनेकदा तिने बेबी बम्प फ्लाँट करतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. इलियाना डिक्रूज अद्याप लग्नबंधनात अडकलेली नाही. पण जोडीदाराची ओळख अभिनेत्रीने गुप्त ठेवली आहे. अभिनेत्रीचं नाव याआधी एंड्रयू या फोटोग्राफरसोबत तसेच विकी कौशलचा मेहुणा सेबॅस्टिनशी जोडले गेले होते. 


इलियाना डिक्रूज कोण आहे? (Who Is Ileana D'cruz)


इलियान डिक्रूज ही लोकप्रिय अभिनेत्री आहे. अभिनेत्री मॉडेलिंगच्या माध्यमातून करिअरची सुरुवात केली. पुढे तेलुगू सिनेमांच्या माध्यमातून तिने मनोरंजनसृष्टीत पाऊल ठेवलं. 2012 मध्ये 'बर्फी' (Barfi) या सिनेमाच्या माध्यमातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तिच्या या पहिल्याच सिनेमासाठी तिला सर्वोत्तम पदार्पपणाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. पुढे फटा पोस्टर निकला हिरो, रेड अशा अनेक सुपरहिट सिनेमांच्या माध्यमातून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली.


संबंधित बातम्या


PHOTO: लेहेंग्याला बोल्डनेसचा टच; इलियाना डिक्रूझचे फोटो व्हायरल!