नवी दिल्ली : सध्या देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे देशात लॉकडाऊन लागू करण्यात आला असून 17 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. यामुळे अनेक लोक घरात अडकून आहेत. अनेक उद्योगधंदे बंद असल्यामुळे अनेकांच्या दोन वेळच्या जेवणाची भ्रांत झाली आहे. या संकटकाळात अनेक बॉलिवूडकर गरजूंच्या मदतीसाठी धावून आले आहेत. तसेच अनेकांनी पीएम केअर फंड्ससाठीही मदत केली आहे. याच पार्श्वभूमीवर रविवारी गिव्ह इंडियाच्या वतीने एका वर्च्युअल कॉन्सर्टचं आयोजन करण्यात आलं होतं. ज्याच्या मदतीने कोरोनाविरोधात लढा देण्यासाठी मदत गोळा करण्यात आली. या वर्च्युअल कॉन्सर्टमध्ये एंटरटेन्मेन्ट इंडस्ट्रीमधील अनेक नामांकित सेलिब्रिटी सहभागी झाले होते. यामध्ये आमिर खान, शाहरूख खान, आलिया भट आणि करिना कपूरही सहभागी झाली होती.



जवळपास 4 तास चाललेल्या वर्च्युअल कॉन्सर्टमध्ये खिलाडी अक्षय कुमार कविता ऐकवताना दिसला तर आमिर खान आपली पत्नी किरण रावसोबत गाणं गाताना दिसून आला. आमिर खानने बॉलिवूडमधील दोन सुपरहिट गाणी गायली. त्यामध्ये 'चल लेके मुझे तू नीले गगन के तले' आणि 'जीना इसी का नाम है' या गाण्यांचा समावेश होता.



तर अभिनेता शाहरूख खानही गाण गाताना दिसला. दरम्यान, या लाइव्ह इव्हेंटमध्ये शाहरूखचा मुलगा अबरामही सहभागी झाला होता. शाहरूखचा त्याच्या मुलासोबतचा हा खास व्हिडीओ सध्या सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे.


याव्यतिरिक्त सैफ अली खान आणि करिना कपूर खानही या कॉन्सर्टमध्ये सहभागी झाले होते. त्यांनी गरजूंच्या मदतीसाठी पैसे डोनेट करण्यासाठी चाहत्यांना एक भावनिक आवाहनही केलं. तर अभिषक बच्चनने देखील यादरम्यान सांगितले की, ज्या व्यक्ती सध्या आपल्या कुटुंबियांसोबत घरात आहेत. त्या खरचं नशबीवान आहेत. परंतु, देशात सर्वच त्यांच्याप्रमाणे नशीबवान नाहीत, त्यामुळे लोकांनी गजूंच्या मदतीसाठी पुढे येणं गरजेचं आहे.


संबंधित बातम्या : 


Lockdown | गरजूंच्या मदतीसाठी पुन्हा सरसावला सलमान खान, उलिया वंतूर आणि जॅकलीन फर्नांडीस यांचाही सहभाग

बाबा एकदम ठीक, अभिनेते नसीरुद्दीन शाह यांच्या प्रकृतीच्या अफवांबाबत मुलाचं ट्वीट

Coronavirus | वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी विद्या बालनने गोळा केले 2500 PPE किट्स अन् लाखो रूपयांचा मदतनिधी

coronavirus | कोरोनाच्या जनजागृतीसाठी सलमानचे 'प्यार करोना' गाणे रिलीज