मुंबई : बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानच्या बलात्कार पीडितसंदर्भातील विधानावर वाद झाल्याने त्याचे वडील आणि लेखक सलीम खान यांनी माफी मागितलं आहे. सलमानने त्याच्या कामाबाबत जे उदाहरण दिलं, ते चुकीचंच आहे आणि त्यात कोणतीही शंका नाही. पण त्याचा उद्देश चुकीचा नव्हता, असं सलीम खान यांनी ट्विटरवर लिहिलं आहे.

 

 

'सुलतान' चित्रपटाच्या शूटिंगनंतर आपल्याला बलात्कार पीडितेसारखं वाटत असल्याचं वादग्रस्त वक्तव्य सलमान खानने केलं आहे.

 
'दररोज 120 किलो वजनाच्या माणसाला 10 वेगवेगळ्या अँगलमधून 10 वेळा उचलावं लागत होतं. दररोज सहा तास ही कसरत केल्यानंतर मला धड चालताही येत नव्हतं. कुस्तीच्या आखाड्यातून बाहेर पडताना मला बलात्कार झाल्यासारखं वाटायचं,' असं विधान सलमानने एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत केलं होतं.

 



 

यानंतर मुलाचा बचाव करताना सलीम खान म्हणाले की, मी माझं कुटुंब, फॅन्स आणि मित्रांच्यावतीने माफी मागतो. तसंच 'मनुष्याकडून चुका होतात आणि देव त्यांना माफ करतो. आज योग दिवसाला या चुकीचं दुकान चालवू नका,' असंही सलीम खान म्हणाले.

 

सलमानच्या मुलाखतीचा ऑडिओ