मुंबई : घटस्फोटानंतर साधारणपणे नवरा-बायको एकमेकांचं तोंड पाहणंही पसंत करत नाहीत. जोडपं जर बॉलिवूडमधलं असेल तर त्यांच्यावर समोरासमोर येण्याची वेळ ओढावू शकते. मात्र हृतिक आणि सुझान या घटस्फोटित कपलमधले संबंध अवाक करणारे आहेत. डिव्होर्सनंतरही सुझानने हृतिकला चक्क भरभरुन शुभेच्छा दिल्या आहेत, त्याही सोशल मीडियावर.


नवीन वर्षाच्या स्वागताला हृतिक सुझानच्या कुटुंबीयांसोबत दुबईमध्ये दिसला होता. त्यानंतर हृतिकच्या 43 व्या बर्थडेला सुझानने इन्स्टाग्रामवर स्पेशल शुभेच्छा दिल्या आहेत. कंगना रनौतसोबत झालेल्या कायदेशीर लढाईतही सुझानने हृतिकचीच बाजू उचलून धरली होती.

हृतिकचा 'काबील' हा चित्रपट 25 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. हृतिक सध्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.