Sussanne Khan, Hrithik Roshan : बॉलिवूड सुपरस्टार हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि सुझान खान (Sussanne Khan) ही जोडी घटस्फोट घेऊन वेगळी झाली असली, तरी त्यांची मैत्री अजूनही कायम आहे. मुलं हृहान आणि ह्रदान यांच्या सहपालकत्वापासून ते कुटुंबातील कोणत्याही उत्सवापर्यंत, हे जोडी आजही एकत्र दिसते. नुकताच हृतिक पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. याचं कारणही तसं खास आहे.


नुकताच हृतिक एका कार्यक्रमादरम्यान सुझान खान आणि तिचा बॉयफ्रेंड अर्सलान गोनीसोबत फोटो पोज देताना दिसला होता. यानंतर त्याने सुझानच्या पोस्टवर कमेंट करत तिचे कौतुक केले आहे. त्याने तिला ‘सुपरस्टार’ म्हटले आहे.


हृतिकने केलं सुझानचं कौतुक!


सुझान खानने अलीकडेच व्हिस्की ब्रँडचा Chivas Regalसाठी एक लिमिटेड एडिशन पॅक लाँच केला आहे. सुझानने तिच्या इंस्टाग्रामवर या कार्यक्रमाच्या फोटोंचा व्हिडीओ बनवून शेअर केला आहे. यामध्ये हृतिक सुझानचा कथित बॉयफ्रेंड अर्सलान गोनीसोबत पोज देताना दिसली. याशिवाय हृतिकने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर सुझानसाठी एक पोस्टही लिहिली होती.


सुझान खानच्या पोस्टवर कमेंट करताना हृतिकने लिहिले की, ‘सुझान तुझे अभिनंदन..हे कमाल होते’. याशिवाय, त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर व्हिडीओ पुन्हा पोस्ट करताना, त्याने लिहिले, ‘सुझानचा तुझा खूप अभिमान आहे. तू सुपरस्टार आहेस.’



रिलेशनशिपमुळे चर्चेत


हृतिक रोशन-सुझान खान सध्या त्यांच्या प्रोफेशनल लाईफपेक्षा पर्सनल लाईफमुळे अधिक चर्चेत आहेत. एकीकडे हृतिक रोशन सध्या अभिनेत्री सबा आझादला डेट करत आहे. त्याच वेळी इंटीरियर आणि फॅशन डिझायनर सुझान खान अर्सलान गोनीला डेट करत आहे. या दोन्ही जोड्या त्यांच्या रिलेशनशिप स्टेटसबद्दल नेहमीच चर्चेत असतात.


फॅमिली फोटोंमध्येही दिसू लागलीये सबा!


काही दिवसांपूर्वी ह्रतिकचा एक फॅमिली फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या फोटोमध्ये सबा देखील दिसत होती. 20 फेब्रुवारी रोजी ह्रतिक रोशनच्या फॅमिलीसोबत संडे लंच करण्यसाठी सबा त्याच्या घरी गेली होती. राजेश रोशननं हा फॅमिली फोटो शेअर केला होता.


हेही वाचा :