Kaho Naa Pyaar Hai : भारतीय सिनेसृष्टीतील अनेक चांगल्या चित्रपटांनी (Bollywood Movies) बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. या चित्रपटांनी अनेक रेकॉर्ड्स आपल्या नावे केले आहेत. 'कहो ना प्यार है' (Kaho Naa Pyaar Hai) या चित्रपटाचाही यात समावेश आहे. 2000 मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. 'कहो ना प्यार है' या चित्रपटाच्या माध्यमातून हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि अमीषा पटेलने (Ameesha Patel) बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पैशांचा पाऊस पाडला. पण दुसरीकडे या चित्रपटाने केलेले रेकॉर्ड्स अद्याप कोणाला ब्रेक करता आले नाहीत. 'कहो ना प्यार है' हा त्याकाळचा सर्वात लोकप्रिय चित्रपट होता. या चित्रपटातील गाणी, संवाद, कथानक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं आहे. 'कहो ना प्यार है' या चित्रपटाने हृतिक रोशन आणि अमीषा पटेल यांना स्टारडम दिलं. तसेच त्यांना अनेक पुरस्कारदेखील मिळाले. निर्मात्यांनी विचारही केला नव्हता एवढा हा चित्रपट यशस्वी झाला.


'कहो ना प्यार है'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन (Kaho Naa Pyaar Hai Box Office Collection)


'कहो ना प्यार है' हा एक साधारण चित्रपट होता. त्यावेळी हृतिक रोशन आणि अमीषा पटेलवर मुलं-मुली फिदा होत होती. मीडिया रिपोर्टनुसार, 'कहो ना प्यार है' या चित्रपटाचे त्याकाळी अनेक शोज हाऊसफुल्ल होत होते. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाचा चांगलाच बोलबाला होता. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, 'कहो ना प्यार है' या चित्रपटाचं बजेट 10 कोटी रुपये होतं. तर जगभरातील बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने 78.93 कोटींची कमाई केली. प्रेक्षकांना आजही हा चित्रपट झी 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येईल. 


शाहरुख- सलमानला टाकलेलं मागे


'कहो ना प्यार है' हा चित्रपट 14 जानेवारी 2000 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला आणि ब्लॉकबस्टर ठरला. त्यावेळी सलमान खानचा 'दुल्हन हम ले जाएंगे' हा चित्रपट 15 जानेवारी 2000 मध्ये प्रदर्शित झाला होता. 11 कोटी रुपयांचं बजेट असलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 36.84 कोटी रुपयांची कमाई केली. सलमान खान आणि करिश्मा कपूर या चित्रपटात मुख्य भूमिकेत होते. 'मोहब्बतें' हा चित्रपटही 27 ऑक्टोबर 2000 रोजी प्रदर्शित झाला. अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत होते. 19 कोटींचं बजेट असलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 76.91 कोटी रुपयांची कमाई केली. 'मोहब्बतें' आणि 'दुल्हन हम ले जाएंगे'च्या तुलनेत हृतिक रोशनच्या 'कहो ना प्यार है' या चित्रपटाने चांगलीच कमाई केली. त्यामुळे हृतिक रोशनने सलमान-शाहरुखला मागे टाकलं.


'कहो ना प्यार है' अवॉर्ड्स


'कहो ना प्यार है' या चित्रपटाला वेगवेगळ्या कॅटेगरीतील 92 पुरस्कार मिळाले आहेत. आजवर हा रेकॉर्ड कोणालाही तोडता आलेला नाही. मीडिया रिपोर्टनुसार, सर्वाधिक पुरस्कार मिळवणारा चित्रपट म्हणून 'कहो ना प्यार है' या चित्रपटाची नोंद 2002 मध्ये गिनीज बुकमध्ये करण्यात आली होती. अमेरिकेतही या चित्रपटाचं चांगलं कौतुक झालं. 


'कहो ना प्यार है'ची गोष्ट काय होती? (Kaho Naa Pyaar Hai Movie Story)


'कहो ना प्यार है' या चित्रपटाचं कथानक राकेश रोशन यांनी लिहिलं आहे. तसेच त्यांनीच या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शनाची धुरा सांभाळली होती. तर रवी कपूर यांनी या चित्रपटाची पटकथा लिहिली होती. 'कहो ना प्यार है' या चित्रपटात एक प्रेमकथा दाखवण्यात आली होती. चित्रपटात हृतिक रोशन अमीषा पटेलच्या प्रेमात पडतो असे दाखवण्यात आले आहे. दोघे एकमेकांच्या प्रेमात पडतात. पण श्रीमंत-गरीबीमध्ये येते. आता पुढे काय होतं हे पाहण्यासाठी प्रेक्षकांना सिनेमाच पाहावा लागेल.


संबंधित बातम्या


Anuradha Paudwal : धक-धक करने लगा; लोकप्रियतेच्या शिखरावर असतानाच अनुराधा पौडवाल यांच्या करिअरला लागला ब्रेक; कारण होत्या लता मंगेशकर?