Sonu Sood On Ranveer Singh : न्यूड फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यानं अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. त्याच्या विरोधात मुंबईमध्ये गुन्हा देखील दाखल झाला आहे. अनेक लोक रणवीरच्या या फोटोशूटला विरोध करत आहे. रणवीरच्या न्यूड फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. या फोटोंना कमेंट करुन अनेकांनी रणवीरचं कौतुक केलं तर काहींनी त्याला ट्रोल देखील केलं. आता रणवीर सिंहच्या न्यूड फोटोशूटवर सोनू सूदने प्रतिक्रिया दिली आहे.
सोनूने रणवीर सिंहच्या फोटोशूटचे समर्थन करत म्हणाला,"फोटोशूट कसे करायचं हा प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय आहे. आपण अशा समजात राहतो जिथे तुम्ही काहीही केलं तर तुमच्याकडे बोट दाखवणारी मंडळी असतात. पण जेव्हा तुम्ही असं काही करण्याचा विचार करता, तेव्हा तुम्हाला लोकांच्या प्रतिक्रिया काय असतील याचा अंदाज असतो. त्यामुळे जर त्या प्रतिक्रियांसाठी तुम्ही तयार असाल तर असे काही करण्यास हरकत नाही."
न्यूड फोटोशूटप्रकरणी रणवीर सिंह विरोधात चेंबूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. भारतीय संस्कृतीचे उल्लंघन केल्याने तसेच महिलांच्या भावना दुखावल्याने एका स्वयंसेवी संस्थेने रणवीर सिंह विरोधात चेंबूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
अभिनेता रणवीर सिंहने एका मॅगझीनच्या कव्हरसाठी न्यूड फोटोशूट केलं आहे. या फोटोशूटने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला. या फोटोमध्ये रणवीर कपड्याविना टर्किश गालीच्यावर विविध पोज देताना दिसला. त्याने वेगवेगळ्या पोज दिल्या. या पोज जो बर्ट रेनॉल्ड्सच्या कवरपासून प्रेरित आहेत. हे फोटो रणवीरने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
संबंधित बातम्या