Kangana Ranaut : बॉलिवूडची पंगाक्वीन कंगना रनौत (Kangana Ranaut) सध्या 'इमरजंसी' (Emergency) सिनेमामुळे चर्चेत आहे. कंगना सध्या या सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या सिनेमात कंगना मुख्य भूमिकेत असून दिग्दर्शनाची धुरादेखील सांभाळत आहे. शूटिंग दरम्यान कंगनाला डेंग्यू झाला आहे. पण कंगना विश्रांती घेण्याऐवजी 'इमर्जन्सी'चे शूटिंग पूर्ण करत आहे. 


'इमरजंसी' या सिनेमाची निर्मिती मणिकर्णिका फिल्म्सच्या बॅनरखाली होत आहे. त्यामुळे कंगनाला डेंग्यू झाल्याची माहिती  मणिकर्णिका फिल्म्सच्या इन्स्टाग्राम स्टोरीवरून देण्यात आली आहे. त्यांनी कंगनाचे सेटवर काम करतानाचे काही फोटो शेअर केले आहेत. फोटो शेअर करत त्यांनी लिहिलं आहे, डेंग्यू झाल्यावर पांढऱ्या रक्त पेशींची संख्या झपाट्याने कमी होते आणि ताप येतो. अशा अवस्थेत काम करणं वेडेपणा आहे...पॅशन नाही". 



'इमरजंसी'मध्ये कंगना इंदिरा गांधीच्या भूमिकेत 


'इमरजंसी' या सिनेमात कंगना रनौत इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमातील कंगनाचा लूक सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. 'इमरजंसी' या सिनेमात कंगनासह, श्रेयस तळपदे आणि अनुपम खेर महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. मराठमोळा श्रेयस माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. तर क्रांतिकारी नेते जेपी नारायण यांच्या भूमिकेत अनुपम खेर दिसणार आहेत. 






2023 मध्ये 'इमरजंसी' येणार प्रेक्षकांच्या भेटीला


'इमरजंसी' हा सिनेमा 2023 मध्ये सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. इमरजंसी सिनेमाचे दिग्दर्शन, कथा लेखन आणि निर्मिती देखील कंगनाच करत आहे. हा सिनेमा 25 जून 1975 रोजी इंदिरा गांधींनी घोषित केलेल्या अंतर्गत आणीबाणीवर आधारित आहे. 


कंगनाचे आगामी सिनेमे


कंगनाचा धाकड सिनेमा काही दिवसांपूर्वी  प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. पण हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फारशी जादू दाखवू शकला नाही. धाकड चित्रपट झी-5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर सध्या प्रेक्षक पाहू शकतात. तिचा 'तेजस' हा  चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे. या चित्रपटात कंगनाने भारतीय हवाई दलाच्या फायटर पायलटची भूमिका साकारली आहे. कंगनाने तिच्या 'मणिकर्णिका रिटर्न्स' आणि 'सीता - द इनकार्नेशन' या चित्रपटांची घोषणा केली आहे. कंगनाचा  'टिकू वेड्स शेरू' हा आगामी चित्रपट देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.


संबंधित बातम्या


Kangana Ranaut : ‘तू खूप हुशार आहेस...’, ‘इमर्जन्सी’चा टीझर पाहून अनुपम खेर यांनी केले कंगना रनौतचे कौतुक!


Emergency Teaser : 'Emergency'चा टीझर रिलीज; कंगना रनौतनं साकारली इंदिरा गांधींची भूमिका