Vidya Balan On Ranveer Singh : न्यूड फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यानं अभिनेता  रणवीर सिंह (Ranveer Singh) वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. त्याच्या विरोधात मुंबईमध्ये गुन्हा देखील दाखल झाला आहे. अनेक लोक रणवीरच्या या फोटोशूटला विरोध करत आहे. रणवीरच्या न्यूड फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. या फोटोंना कमेंट करुन अनेकांनी रणवीरचं कौतुक केलं तर काहींनी त्याला ट्रोल देखील केलं. आता रणवीर सिंहच्या न्यूड फोटोशूटवर अभिनेत्री विद्या बालननं (Vidya Balan)  प्रतिक्रिया दिली आहे. 


मुंबईमध्ये अभिनेत्री कुब्रा सैतच्या 'ओपन‌ बुक' या पुस्तकाच्या लाँच प्रोग्रॅममध्ये विद्या बालननं हजेरी लावली होती. तेव्हा विद्याला रणवीरच्या न्यूड फोटोशूटबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावेळी विद्या म्हणाली, ' त्यानं काय चुकीचं केलं? कधी कधी आम्हाला देखील असं काही बघायला मिळायला हवं'. विद्याच्या या प्रतिक्रियानं अनेकांचे लक्ष वेधले. अभिनेता अर्जुन कपूर, राम गोपाल वर्मा आणि अभिनेत्री आलिया भट यांनी देखील रणवीरला सपोर्ट केला. 



बुधवारी रात्री मुंबईमध्ये अभिनेत्री कुब्रा सैतच्या 'ओपन बुक' या पुस्तकाच्या लाँचच्या वेळी विद्या बालनने तिच्या आयुष्यातील आठवणींना उजाळा दिला. यावेळी विद्या बालन व्यतिरिक्त मंजरी फडणीस, नकुल मेहता, करण कुंद्रा, तेजस्वी प्रकाश, झाकीर खान असे अनेक सेलिब्रिटींनी या पुस्तक लाँचच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. 


रणवीरने Paper magazine website च्या मॅगझीनच्या कव्हरसाठी न्यूड फोटोशूट केले.रणवीरचे हे न्यूड फोटो सोशल मीडियावर मे किंवा जूनमध्ये रिलीज करण्यात येणार होते. पण रणवीरचा चित्रपट तेव्हा रिलीज करण्यात येणार होता. त्यामुळे फोटोशूटचे फोटो उशीरा रिलीज करण्यात आले. रणवीरच्या आधी अनेक सेलिब्रिटींनी न्यूड फोटोशूट केलं आहे. मिलिंद सोमण, मधु सप्रे, आमिर खान, शर्लिन चोप्रा, पूजा बेदी,सपना भवनानी या सेलिब्रिटींनी न्यूड फोटोशूट केले होते. 


हेही वाचा: