Thor Love and Thunder Collection in India : हॉलिवूडचा सुपरस्टार क्रिस हेम्सवर्थचा (Chris Hemsworth) 'थोर लव्ह अॅन्ड थंडर' (Thor Love And Thunder) हा सिनेमा जगभरात प्रदर्शित झाला आहे. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. जगभरात या सिनेमाने अनेक रेकॉर्ड केले आहेत. भारतात या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 100 कोटींचा टप्पा पार केला आहे. 


'थोर लव्ह अॅन्ड थंडर'ची भारतीत कमाल


'थोर लव्ह अॅन्ड थंडर' हा सिनेमा सध्या सिनेमागृहात चांगलाच धुमाकूळ घालत आहे. जगभरात या सिनेमाने 699 मिलियन डॉलरची कमाई केली आहे. 7 जुलैला हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित झाला होता. भारतात या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 100 कोटींची कमाई केली आहे. भारतात या सिनेमाला जादू दाखवण्यात यश आले आहे.


'थोर लव्ह अॅन्ड थंडर' हा सिनेमा 7 जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला आला असला तरी या सिनेमाने रिलीजच्या एक दिवस आधीच भारतात 18 कोटींची कमाई केली होती. रिलीजच्या पहिल्या विकेंडला या सिनेमाने 64.80 कोटींचा गल्ला जमवला आहे. भारतात 100 कोटींचा टप्पा पार करणारा हा दुसराच हिंदी सिनेमा आहे. 






अॅक्शनचा तडका असलेला 'थोर लव्ह अॅन्ड थंडर'


'थोर लव्ह अॅन्ड थंडर' हा सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला असून या सिनेमात प्रेक्षकांना अॅक्शनचा तडका पाहायला मिळणार आहे. मार्वल सिनेमॅटिक यूनिवर्सचा हा 29 वा सिनेमा आहे. या सिनेमात थोर अॅक्शनसह रोमॅंटिक अंदाजातदेखील दिसणार आहे. हा सिनेमा सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. भारतात हा सिनेमा हिंदी, इंग्रजी, तामिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित झाला आहे. टायका वायटीटीने या सिनेमाच्या दिग्दर्शनाचे काम केलं आहे. 


जाणून घ्या 'थोर लव्ह अॅन्ड थंडर'ची कमाई


'थोर लव्ह अॅन्ड थंडर' या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या आठवड्यात 79.07 कोटी, दुसऱ्या आठवड्यात 14.46, तिसऱ्या आठवड्यात 4.34 कोटी आणि चौथ्या आठवड्यात 1.69 कोटी तर पाचव्या आठवड्यात 46 कोटींची कमाई केली आहे. 


संबंधित बातम्या


Thor Love And Thunder : 'थोर लव्ह अॅन्ड थंडर' प्रेक्षकांच्या पसंतीस; भारतात केली रेकॉर्डब्रेक कमाई


Thor Love And Thunder : 'थोर लव्ह अॅन्ड थंडर'चा धमाका; बॉलिवूड सिनेमांना टाकलं मागे