Honey Singh : लोकप्रिय गायक आणि रॅपर 'यो यो हनी सिंह' (Honey Singh) सध्या चांगलाच चर्चेत आहे. यशाच्या शिखरावर असताना अचानक हनी सिंहचं करिअर बुडालं होतं. आता पुन्हा एकदा स्वत:चं अस्तिस्व टिकवण्यासाठी त्याचा स्ट्रगल सुरू आहे. अनेक सुपरहिट रॅप साँग आणि गाणी गायल्यानंतर हनी सिंह अचानक संगीतक्षेत्रातून गायब झाला. कौटुंबिक अडचणी आणि ड्रग्जमुळे हनी सिंह गायब झाला होता. व्यसनाच्या आहारी गेल्याने हनी सिंह यशाच्या शिखरावरुन थेट खाली आपटला. आजही पूर्वीसारखी लोकप्रियता मिळवण्यासाठी हनी सिंह खूप मेहनत घेत आहे. म्युझिक अल्बम आणि लाईव्ह कॉन्सर्टच्या माध्यमातून चाहत्यांची मने जिंकण्यासाठी हनी सिंह सज्ज आहे. आता नुकत्याच एका कॉन्सर्टदरम्यान हनी सिंहने चाहत्यांना मोठा सल्ला दिला आहे. 


गांजा ओढू नका : हनी सिंह (Honey Singh Advive to Fans)


हनी सिंह नुकतच एका कॉन्सर्टदरम्यान परफॉर्म करत होता. त्यावेळी अचानक चाहत्यांना सल्ला देत YO YO Honey Singh म्हणाला,"बहिणी आणि भावांनो गांजा ओढू नका. या व्यसनामुळे माझ्या आयुष्यातील पाच वर्षे वाया गेली आहेत. दारू किती प्यायची तेवढी प्या पण गांजा ओढू नका. माझं आयुष्य उद्ध्वस्त झालंय". हनी सिंहने मनापासून चाहत्यांना हा सल्ला दिला आहे. एकंदरीतच हनी सिंहच्या या वक्तव्यामुळे गांजामुळे त्याचं आयुष्य बर्बाद झालंय हे त्याला कळलं असल्याचं स्पष्ट होत आहे.






हनी सिंह आणि बादशाहच्या गाण्यांची चाहत्यांना उत्सुकता!


हनी सिंह आणि बादशाह (Badshah) या जोडीने आजवर अनेक सुपरहिट गाणी गायली आहेत. हनी सिंहच्या अनेक गाण्यांतील रॅप बादशाहने लिहिले आहेत. जगभरातील हे रॅप साँग सुपरहिट झाले आहेत. पण आपल्यामुळे हनी सिंह लोकप्रिय होतोय हे बादशाहला कळल्यानंतर त्याने त्याच्यासाठी गाण्याचे बोल लिहिणं बंद केलं होतं. आता हनी सिंह आणि बादशाह या जोडीची गाणी ऐकण्याची चाहत्यांना उत्सुकता आहे.


कोण आहे हनी सिंह? (Who is Honey Singh)


हनी सिंहचा जन्म 15 मार्च 1983 रोजी पंजाबमधील होशियारपुरमध्ये झाला. जगभरात 'यो यो हनी सिंह' या नावाने हनी लोकप्रिय रॅपर आणि गायक चर्चेत असतो. हनी सिंहच्या वडिलांचे नवा सरदार सरबजीत सिंह असून आईचे नाव भूपिंदर कौर आहे. दिल्लीतील गुरु नानक पब्लिक स्कूलमध्ये हनी सिंहचं शालेय शिक्षण झालं आहे. 1995 मध्ये हनी सिंहने इंग्लिश गाणी ऐकायला सुरुवात केली. पुढे याच क्षेत्रात करिअर करण्याचा त्याने निर्णय घेतला. हनी सिंहने 'अंग्रेजी बीट','ब्राउन रंग','गबरू','लुगी डान्स','पार्टी विथ भूतनाथ','देसी कलाकार','लव्ह डोज','सनी सनी' अशी अनेक गाणी गायली आहेत. 


संबंधित बातम्या


Urvashi Rautela Birthday : उर्वशी रौतेलाने वाढदिवशी कापला 24 कॅरेट सोन्याचा केक; फोटो पाहून चाहते हैराण