Holi 2022 : आज देशभरात होळीचा सण साजरा केला जात आहे. सर्वसामान्यांपासून ते बॉलिवूड सेलिब्रिटींपर्यंत सर्वांनी मोठ्या उत्साहात होळीचा सण साजरा केला आहे. अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

मौनी रॉयमौनी रॉयने तिचा पती सूरज नांबियारसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करत तिने लिहिले आहे,"तुमचे जीवन नेहमी आनंदाच्या रंगांनी भरले जावो, होळीच्या शुभेच्छा".

 

मृणाल ठाकुरअभिनेत्री मृणाल ठाकूरने 'हॅपी होली' असे कॅप्शन लिहित  मित्रांसोबतचे रंगांचे उधळण करतानाचे फोटो शेअर केले आहेत.

करीना कपूर खानबॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खानने तिचा धाकटा मुलगा जेहसोबतचा फोटो शेअर केला आहे. या फोटोत ती जेहसोबत वाळूत खेळताना दिसत आहे.

अक्षय कुमारअक्षय कुमारने होळीच्या निमित्ताने चाहत्यांसोबत एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओत तो रंगांची उधळण करताना दिसत आहे.

कतरिना कैफकतरिना कैफ आणि विकी कौशलने लग्नानंतरची पहिली होळी कुटुंबियांसोबत साजरी केली आहे. त्यांचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

संबंधित बातम्या 

TOP 5 Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या

Man Udu Udu Zhala : 'मन उडू उडू झालं' मालिकेत नवा ट्विस्ट, इंद्रा-दीपूच्या प्रेमाबद्दल सानिकाला कळणार?

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha