Laal Singh Chaddha: बॉलिवूड अभिनेता आमिर खान (Aamir Khan) याचा ‘लाल सिंह चड्ढा’ (Laal Singh Chaddha) हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून सतत वादात अडकला आहे. चित्रपटाबाबत सोशल मीडियावर देखील मोठी चर्चा पाहायला मिळाली. या निमित्ताने चित्रपटाला पाठिंबा देणाऱ्या आणि न देणाऱ्या अशा दोन भागात सोशल मीडिया विभागला गेला आहे. काही लोकांनी चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी केली आहे, तर काहींनी चित्रपटाची कथा आणि पात्रांच्या अभिनयाचे कौतुक केले आहे. मात्र, या सगळ्यात अनेक बॉलिवूड कलाकार आमिर खानच्या समर्थनात पुढे आले आहेत. त्यांनी आमिरच्या ‘लाल सिंह चड्ढा’चे कौतुक केले आहे.


बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) याने नुकतेच ट्विट करून चित्रपटाचे कौतुक केले आहे. त्याने लिहिले की, 'मला हा चित्रपट आवडला. वादविवाद एका बाजूला ठेवा, हा एक उत्तम चित्रपट आहे. हा चित्रपता पाहणे चुकवू नका. जा आणि आताच हा चित्रपट बघा.’



सुष्मितानेही केले कौतुक


अभिनेत्री सुष्मिता सेनने (Sushmita Sen) देखील आपल्या ट्विटमध्ये लिहिले होते की, 'किती सुंदर सादरीकरण आहे!! संपूर्ण टीमचे अभिनंदन... लाल सिंह चड्ढा हा चित्रपट पाहणे खूप छान वाटले!!'



नेहा धुपियाने लिहिली पोस्ट


नेहा धुपियाने (Neha Dhupia) अलीकडेच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यात तिने लोकांना आमिर खान स्टारर हा चित्रपट पाहण्याचे आवाहन केले आहे. तिने लिहिले की, 'लाल सिंह चड्ढा हा चित्रपट नसून जादू आहे. एक अशी जादू जी तुम्हाला अशा जगात घेऊन जाते, जिथे फक्त चांगल्या गोष्टी अस्तित्वात आहे. आमिर खानला हे चांगलेच कळते. चित्रपटातील प्रत्येक क्षण तुम्हाला आवडेल आणि प्रत्येक क्षण तुम्हाला जादूसारखा वाटेल. मी फक्त व्यवसायासाठी नाही, तर एक प्रेक्षक म्हणून चित्रपट पाहण्यासाठी जाते.’




ऑस्करच्या पेजवर स्थान


‘लाल सिंह चड्ढा; या चित्रपटाला ऑस्करच्या अधिकृत सोशल मीडिया पेज 'द अकादमी' वर एक विशेष स्थान मिळाले आहे. 'फॉरेस्ट गंप' आणि 'लाल सिंग चड्ढा'मधील रॉबर्ट झेमेकिस आणि एरिक रॉथ यांची सर्वसमावेशक कथा शेअर करताना, त्यातील एकसारखे सीन शेअर करण्यात आले आहेत. 'लाल सिंह चड्ढा'  हा चित्रपट ‘फॉरेस्ट गंप’चा अधिकृत रिमेक आहे. या चित्रपटात टॉम हँक्सने साकारलेली व्यक्तिरेखा आमिर खानने साकारली आहे. आमिरचा हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच या चित्रपटाला खूप विरोध झाला असला, तरी आमिर आणि करीनाचे चाहते ‘लाल सिंह चड्ढा’ आवर्जून पाहत आहेत. अनेक विरोधानंतर अखेर हा चित्रपट पाहण्यासाठी काही लोक चित्रपटगृहात पोहोचले होते.


वाचा इतर महत्वाच्या बातम्या: