Urfi Javed Molester Arrested : चित्रविचित्र स्टाईल्समुळे उर्फी जावेद (Urfi Javed) सोशल मीडियावर चर्चेत असते. उर्फीला नेटकरी ट्रोल करताना दिसून येतात. ट्रोलिंगकडे दुर्लक्ष करत उर्फी दररोज नवीन स्टाईलमधील तिचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. गेल्या काही दिवसांपासून एक व्यक्ती उर्फीकडे ब्लॅकमेल करत धमकी देत होता. पण आता या धमकी देणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
धमकी देणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती उर्फीने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना दिली आहे. काही दिवसांपूर्वी उर्फीने तिला ब्लॅकमेल करत धमकी देणाऱ्या व्यक्तीचे स्क्रीनशॉट इंस्टाग्रामवर पोस्ट केले होते. स्क्रीनशॉट शेअर करत मुंबई पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेतल्याची माहिती चाहत्यांना दिली होती. आता पुन्हा उर्फीने त्या व्यक्तीचा फोटो शेअर करत त्याला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती चाहत्यांना दिली आहे. उर्फी जावेदचा फोटो मॉर्फ करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतल्याने चाहत्यांना दिलासा मिळाला आहे.
उर्फीने घेतली होती चाहतची शाळा
उर्फीने चाहतच्या कमेंटचा स्क्रीनशॉट शेअर करत लिहिलं होतं, "मी फॉलोअर्स वाढवण्यासाठी हा ड्रेस परिधान केलेला नसून एका मुलाखतीसाठी घातला होता. तू माझ्यावर जळू नकोस. तू दोन व्यक्तींसोबत घटस्फोट घेतलास तेव्हा मी तुला कोणत्या गोष्टीवरून जज केलं नाही. तर तु मला का जज करतेस".
उर्फीला मिळाला रुग्णालयातून डिस्चार्ज
गेल्या काही दिवसांपासून उर्फीला उलट्या होत होत्या. त्यानंतर तिला ताप यायला लागला. त्यामुळे तिला मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले. कोकिलाबेन रुग्णालयात उर्फीवर दोन दिवस उपचार सुरू होते. त्यानंतर तिला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आहे.