Laal Singh Chaddha : सध्या सोशल मीडियावर लाल सिंह चड्ढा (Laal Singh Chaddha) या चित्रपटाची चर्चा सुरु आहे. काही लोक या चित्रपटाचं कौतुक करत आहेत तर काही या चित्रपटाला बायकॉट करण्याची मागणी करत आहेत. अभिनेता आमिर खानच्या (Aamir Khan) काही जुन्या वक्तव्यांमुळे या चित्रपटावर बहिष्कार टाकायची मागणी सध्या नेटकरी करत आहेत. पण आता पंजाबचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे नेते भगवंत मान (Bhagwant mann) यांनी लाल सिंह चड्ढा या चित्रपटाचं कौतुक केलं आहे. 


काय म्हणाले भगवंत मान
लाल सिंह चड्ढा या चित्रपटाबाबत पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी एक ट्वीट शेअर केले या ट्विटमध्ये भगवंत मान यांनी लिहिलं, 'लाल सिंग चड्ढा हा चित्रपट मी पाहिला. हा चित्रपट बंधुभावाचे उदाहरण आहे. हा चित्रपट एकमेकांमध्ये द्वेष न करण्याचा संदेश देखील देतो. या अप्रतिम चित्रपटासाठी आमिर खान आणि त्याच्या संपूर्ण टीमचे खूप खूप अभिनंदन.' भगवंत मान यांच्या या ट्वीटनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. 






लाल सिंह चड्ढा हा चित्रपट फॉरेस्ट गंप या हॉलिवूड चित्रपटाचा रिमेक असणार आहे. हा चित्रपट 11 ऑगस्ट 2022 रोजी रिलीज झाला आहे. आमिर खान प्रोडक्शन्स, किरण राव, वायकॉम 18  स्टडियोज  यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. आमिरसोबतच या चित्रपटात करिना कपूर, मनो सिंह, नागा चैतन्य या कलाकारांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. 


'लाल सिंह चड्ढा' चे बॉक्स ऑफिस कलेक्शन
चित्रपटाने रिलीज झाल्यापासून आतापर्यंत देशभरात एकूण 37.96 कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी 11.70 कोटी, दुसऱ्या दिवशी 7.26 कोटी आणि तिसऱ्या दिवशी 8.5 कोटींचा व्यवसाय केला होता.


वाचा इतर महत्वाच्या बातम्या:


Laal Singh Chaddha : 'लाल सिंह चड्ढा' बायकॉट ट्रेंडवर मोना सिंहनं सोडलं मौन; म्हणाली, 'आमिरनं काय केलं?'