Hindustani Bhau Demands To Boycott Goodbye : बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना सध्या 'गुडबाय' (Goodbye) या सिनेमामुळे चर्चेत आहेत. 7 ऑक्टोबरला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अमिताभ आणि रश्मिका 'गुडबाय'चं चांगलचं प्रमोशन करत आहेत. अशातच या सिनेमाला बायकॉट करण्याची मागणी होत आहे. 'बिग बॉस' फेम हिंदुस्तानी भाऊने (Hindustani Bhau) एक व्हिडीओ शेअर करत 'गुडबाय' सिनेमाला बायकॉट करण्याची मागणी केली आहे. 


हिंदुस्तानी भाऊने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत 'गुडबाय' सिनेमाला बायकॉट करण्याची मागणी केली आहे. व्हिडीओमध्ये हिंदुस्तानी भाऊ म्हणतोय,"दोन वर्षांपूर्वी 'एक था कबूतर' ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या सीरिजच्या माध्यमातून भारतीय सैन्यदल, त्यांचे कपडे आणि कुटुंबाला बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यावेळी मी आवाज उठवला होता आणि मला संपूर्ण देशाने मदत केली होती. त्यामुळे आज तुम्हीदेखील 'गुडबाय' सिनेमाला बायकॉट करण्याची मागणी करू शकता". 






हिंदुस्तानी भाऊ पुढे म्हणाला,"भारतीय सैन्यदल आणि त्यांच्या कुटुंबियांना मदत करणं गरजेचं आहे. धर्माची चेष्टा-मस्करी करणाऱ्या सर्व गोष्टींना आपण बायकॉट केलं आहे. त्याचप्रमाणे सैन्य, पोलिस यांची जर कोणी मस्करी करत असेल तर मी त्यांना सोडणार नाही. आज त्यांच्यामुळे आपण सण साजरे करू शकतो". हिंदुस्तानी भाऊचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्यामुळे #boycottgoodbye देखील ट्रेडिंगमध्ये आहे. 


'गुडबाय' 7 ऑक्टोबरला येणार प्रेक्षकांच्या भेटीला


अमिताभ बच्चन आणि रश्मिका मंदान्नाची मुख्य भूमिका असलेला 'गुडबाय' हा सिनेमा आज 7 ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कौटुंबिक नात्यावर बेतलेल्या या सिनेमात प्रेक्षकांना विनोद, नाट्य अशा अनेक गोष्टी पाहायला मिळणार आहेत. या सिनेमाच्या माध्यमातून रश्मिका बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. 'गुडबाय' या सिनेमात अमिताभ बच्चन, नीना गुप्ता आणि रश्मिका मंदान्ना महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 


संबंधित बातम्या


Goodbye Trailer : अमिताभ बच्चन यांच्या 'गुडबाय'चा ट्रेलर रिलीज; रश्मिका मंदान्ना करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण


Goodbye Movie : मजेशीर पद्धतीनं बिग बींनी केलं 'गुडबाय'चं प्रमोशन; रश्मिका म्हणाली, 'पापा...'