Hi Nanna OTT Release: दाक्षिणात्य अभिनेता नानी (Nani) आणि अभिनेत्री मृणाल ठाकूर (Mrunal Thakur) यांचा 'हाय नन्ना' (Hi Nanna) हा चित्रपट 7 डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. बॉक्स ऑफिसवर देखील या चित्रपटानं चांगली कमाई केली. या चित्रपटात मृणाल आणि नानी यांनी पहिल्यांदाच स्क्रिन शेअर केली. थिएटरमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर हाय नन्ना हा चित्रपट ओटीटीवर रिलीज होणार आहे. हा चित्रपट कोणत्या आणि कधी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे? याबाबत जाणून घेऊयात...
कोणत्या प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार 'हाय नन्ना' ? (Hi Nanna OTT Release)
नानी आणि मृणाल यांचा हाय नन्ना हा चित्रपट आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट 4 जानेवारीला नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. नेटफ्लिक्सच्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट शेअर करुन या चित्रपटाच्या ओटीटी रिलीज डेटची घोषणा करण्यात आली आहे. नेटफ्लिक्सच्या अकाउंटवरून पोस्ट शेअर करण्यात आलेल्या पोस्टमध्ये लिहिण्यात आलं,"हाय नन्ना 4 जानेवारी रोजी नेटफ्लिक्सवर तेलुगु, तमिळ, मल्याळम, कन्नड आणि हिंदीमध्ये स्ट्रीम होणार आहे."
हाय नन्ना चित्रपटाचे कथानक
हाय नन्ना हा एक रोमँटिक आणि कौटुंबिक कथानकावर आधारित असणारा चित्रपट आहे. या चित्रपटात मुलगी आणि वडील यांचे नाते दाखवण्यात आलं आहे. या चित्रपटात अभिनेता नानीनं एका मुलीच्या वडिलांची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात मृणाल ठाकूरनं नानीच्या पत्नीची भूमिका साकारली आहे.
हाय नन्ना चित्रपटाची स्टार कास्ट
हाय नन्ना या चित्रपटात नानी आणि मृणाल यांच्यासह बालकलाकार कियारा खन्ना, प्रियदर्शी पुलीकोंडा, अंगद बेदी आणि विराज अश्विन यांनी देखील महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. शौर्यव यांनी 'हाय नन्ना' या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटाचं अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन कौतुक केलं आहे.
संंबंधित बातम्या: