Salaar And Dunki  Box Office Collection: गेल्या काही दिवसांपासून बिग बजेट चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर टक्कर होत आहे. अशातच प्रेक्षकांच्या 2023 या वर्षाचा शेवट मनोरंजनात्मक करण्यासाठी प्रभासचा (Prabhas) सालार (Salaar) आणि शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) डंकी (Dunki) हे दोन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले. डंकी हा चित्रपट सालार या चित्रपटाच्या एक दिवस आधी रिलीज झाला. पण तरी देखील सालार या चित्रपटापेक्षा डंकी हा चित्रपट जास्त कमाई करत आहे. जाणून घेऊयात डंकी आणि सालार या चित्रपटांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन...


'सालार'ची बॉक्स ऑफिसवर जादू (Salaar Box Office Collection)


'सालार' या चित्रपटाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळत आहे. या चित्रपटातील अॅक्शन सीन्सला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. Sacnilk च्या अर्ली रिपोर्टनुसार, सालार या चित्रपटानं रिलीजच्या आठव्या दिवशी म्हणजेच सेकंड फ्रायडेला जवळपास 10 कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाचं आठ दिवसाचं एकूण कलेक्शन 318.00  कोटी एवढे झाले आहे.






'डंकी'चे बॉक्स ऑफिस कलेक्शन (Dunki  Box Office Collection)


Sacnilk च्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, 'डंकी' या चित्रपटानं रिलीजच्या 9व्या दिवशी 7.25 कोटी रुपयांची कमाई केली आहे. यासह 'डंकी' या चित्रपटाची नऊ दिवसांची एकूण कमाई आता 167.47 कोटी रुपये झाली आहे.






'डंकी'ची स्टार कास्ट


डंकी या चित्रपटाचं दिग्दर्शन  राजकुमार हिरानी यांनी केले आहे. या चित्रपटात शाहरुखसोबतच तापसी पन्नू, बोमन इराणी, विकी कौशल, अनिल ग्रोव्हर आणि विक्रांत कोचर यांनी देखील महत्वाची भूमिका साकारली आहे.


'सालार' ची स्टार कास्ट


सालार या चित्रपटाचे दिग्दर्शन केजीएफ फेम प्रशांत नीलने केले आहे. या चित्रपटात प्रभाससोबतच पृथ्वीराज सुकुमारन, श्रुती हासन, जगपती बाबू रेड्डी, टिनू देसाई यांच्यासह अनेक कलाकारांनीही दमदार भूमिका साकारल्या आहेत.


संबंधित बातम्या:


Salaar OTT Release : बॉक्स ऑफिस गाजवल्यानंतर ओटीटीवर रिलीज होणार प्रभासचा 'सालार'; जाणून घ्या कुठे पाहता येईल