Majnu : 'मजनू' (Majnu) सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर लॉंच झाला आहे. सिनेसृष्टीच्या इतिहासात प्रथमचं तीन हजार फुटाच्या उंचीवर हेलिकॉप्टरद्वारे जाऊन 'मजनू' सिनेमातील कलाकारांनी आणि दिग्दर्शकांनी 'मजनू' सिनेमाचा ट्रेलर लॉंच केला आहे.  


कलाकारांच्या उपस्थितीत रंगला ट्रेलर लॉंचचा कार्यक्रम


अभिनेता रोहन पाटील, नितीश चव्हाण, अभिनेत्री श्वेतलाना अहिरे, दिग्दर्शक शिवाजी दोलताडे आणि निर्माते गोवर्धन दोलताडे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत ट्रेलर लॉंच करण्यात आला आहे. 'मजनू' सिनेमात प्रेक्षकांना फाईट, एक्शन, रोमान्स तसेच लव्हस्टोरी अशा बऱ्याच गोष्टी पहायला मिळणार आहेत.  हा सिनेमा तरुणाईच्या ह्रदयाचा ठाव घेईल. या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्याने प्रेक्षक आता सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. 


दिग्दर्शक शिवाजी दोलताडे म्हणाले, सिनेसृष्टीच्या इतिहासात प्रथमचं तीन हजार फुटाच्या उंचीवर जाऊन सिनेमाचा ट्रेलर लाँच केला आहे. याच उंचीप्रमाणे मराठी चित्रपट जागतिक स्तरावर मला घेऊन जायचा आहे. प्रत्येकजन कॉलेजला गेल्या नंतर स्वतःला मजनू समजतो जे लोक हा चित्रपट पाहतील. त्यांना त्यांच्या कॉलजेच्या दिवसांची आठवण आल्याशिवाय राहणार नाही.


सिनेमाचे निर्माते गोवर्धन दोलताडे म्हणाले,"प्रेमाची अनोखी परिभाषा सांगणारा हा मजनू सिनेमा 10 जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. कुटुंबातील सदस्यांनी एकत्र हा सिनेमा पाहावा". इंडियन आयडॉल फेम सलमान अलीने या सिनेमाचं पार्श्वगायन केलं आहे.


सलमान अलीने केले पार्श्वगायन


इंडियन आयडॉल या शोमधून घराघरात पोहचलेला तसेच 10 व्या इंडियन आयडॉल सीझनचा विजेता असलेला पार्श्वगायक सलमान अलीने 'मजनू' या मराठी सिनेमासाठी प्रथमचं मराठीत पार्श्वगायन केले आहे. 'प्रेमाची अनोखी परिभाषा सांगणाऱ्या मजनू सिनेमासाठी गाण्याचा अनुभव खूप छान होता. जन्मभूमी हरियाणा असली तरी कर्मभूमी महाराष्ट्र आहे. अनेक वर्षांपासून मुंबईत वास्तव असल्याने मराठी भाषेची मला गोडी लागली. मराठी सिनेमात मला गायची इच्छा होती ती मजनू सिनेमामुळे माझी पूर्ण झाली, 'असे सलमान अली आवर्जून सांगतो.