Heeramandi : संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांची 'हीरामंडी' (Heeramandi) ही वेबसीरिज नुकतीच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली आहे. सर्वत्र या वेबसीरिजचं कौतुक होत आहे. 'हीरामंडी : द डायमंड बाजार' (Heeramandi : The Diamond Bazaar) या सीरिजमधील अभिनेत्री आदिती राव हैदरीच्या (Aditi Rao Hydari) 'गजगामिनी वॉक'ने (Gajagamini Walk) चाहत्यांना मंत्रमुग्ध केलं आहे. खूपच कमाल रित्या गजगामिनी वॉक स्क्रीनवर चित्रीत करण्यात आला आहे. या वॉकमुळे आदिती राव हैदरीचंदेखील सर्वत्र कौतुक होत आहे.
आदिती राव हैदरीने 'हीरामंडी' या वेबसीरिजमध्ये बिब्बोजानची भूमिका साकारली आहे. फरदीन खानद्वारे अभिनीत नवाब वलीसाठी ती अभिनय करते. आपल्या प्रदर्शनसाठी ती गजगामिनी वॉक करते. मागे पाहते आणि पुन्हा चालायला लागते.
आदिती राव हैदरीआधी या अभिनेत्रींनी केलाय 'गजगामिनी' वॉक
'गजगामिनी' संस्कृत शब्दाचा अर्थ 'हाथी की चाल वाला व्यक्ति' असा होतो. हत्तीप्रमाणे राजेशाही थाट असणारी ही व्यक्ती असते. आदिती रावच्या 'गजगामिनी वॉक'ने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. आदिती राव हैदरीआधी 2000 मध्ये एमएफ हुसैन दिग्दर्शित 'गज गामिनी' या चित्रपटात माधुरी दीक्षितने गजगामिनी वॉक केला होता. त्याव्यतिरिक्त 'मुगल-ए-आजम'मध्ये मधुबालाने 'मोहे पनघट पे' गाण्यात 'गजगामिनी वॉक' केला होता. 'हीरामंडी'तील आदिती राव हैदरीच्या अभिनयाचं कौतुक झालं होतं.
'हीरामंडी 2' येणार प्रेक्षकांच्या भेटीला! (Heeramandi 2 Announcement)
'हीरामंडी' वेबसीरिजला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. 1 मे 2024 रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ही सीरिज रिलीज झाली. या सीरिजच्या सक्सेस पार्टीदरम्यान संजय लीला भन्साळी यांनी 'हीरामंडी 2'ची घोषणा केली आहे.
तगडी स्टारकास्ट असलेली 'हीरामंडी'
संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'हीरामंडी' या वेबसीरिजची स्टारकास्ट खूपच तगडी आहे. मनीषा कोईराला, ऋचा चड्ढा, संजीदा शेख, शर्मिन सेगल, सोनाक्षी सिन्हा, आदिती राव हैदरी, ताहा शाह बचोल, रजत कौल, शेखर सुमन, अध्ययन सुमन, फरदीन खान आणि इंद्रेश मलिक हे कलाकार या सीरिजमध्ये मुख्य भूमिकेत आहेत. चाहत्यांना आता 'हीरामंडी 2'ची प्रतीक्षा आहे.
संबंधित बातम्या