World Most Expensive Movie : बॉलिवूड (Bollywood) आणि हॉलिवूडमध्ये (Hollywood) विविध धाटणीचे, वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करणारे चित्रपट (Movies) प्रदर्शित होत असतात. हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती कोटींचा गल्ला जमवतात हे आता सर्वांनाच कळतं. सिनेसमीक्षक किंवा निर्माते स्वत: सोशल मीडियाच्या माध्यमातून कमाईची चाहत्यांना माहिती देतात. पण काय बजेटमध्ये सिनेमाची निर्मिती झाली आहे हे अनेकदा समोर येत नाही. तुम्हाला कोणी सर्वात महागडा चित्रपट कोणता? (World Most Expensive Movie) असा प्रश्न विचारला असेल तर तुम्ही कोणत्या सिनेमाचं नाव घ्याल. हा चित्रपट वॉर, धूम किंवा अल्लू अर्जुनचा पुष्पा असेल की जुरासिक पार्कसारखा हॉलिवूड चित्रपट असेल. तुमच्या मनात जर या चित्रपटांची नावे आली असतील तर तुमचा अंदाज चुकीचा आहे. 


'हा' आहे सर्वात महागडा चित्रपट (World Most Expensive Movie)


जगातील सर्वात महागडा चित्रपट हा हॉलिवूडपट (Hollywood Movie) आहे. 'स्टार वॉर्स-द फोर्स ऑफ अवेकन्स' असं या चित्रपटाचं नाव आहे. अधिकृतरित्या हा रेकॉर्ड नोंद करण्यात आला आहे. 447 मिलियन डॉलरमध्ये या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. भारतीय चलनानुसार 37,31,26,09,800.00 रुपये आहे. तर 'अवतार-द वे ऑफ वॉटर' या चित्रपटाची निर्मिती 350 मिलियन डॉलर ते 460 मिलियन डॉलरमध्ये करण्यात आल्याची शक्यता आहे. 


तिसऱ्या नंबरवर 'स्टार वॉर्स'


प्रोडक्शन कॉस्टनुसार, जगातील सर्वात महागडा चित्रपट 'स्टार वॉर्स-द फोर्स ऑफ अवेकन्स' आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर 'स्टार वॉर्स-द राइज ऑफ स्काई वॉकर्स' आहे. दुसऱ्या स्थानी जुरासिक वर्ल्ड द फॉलन किंगडम' आहे. चौथ्या क्रमांकावर द फास्ट आहे. पायरेट्स ऑफ द कॅरेबियन-ऑन स्ट्रेंजर टाइड्स पाचव्या क्रमांकावर आहे. 


भारतातील 'टॉप 10' महागडे चित्रपट कोणते? (Top 10 Most Expensive Indian Films)


1. कल्कि 2898 एडी - कल्कि 2898 एडी या चित्रपटाची निर्मिती 600 कोटींमध्ये करण्यात आली होती. 


2. आरआरआर - आरआरआर या चित्रपटाची निर्मिती 550 कोटी रुपयांत करण्यात आली.


3. आदिपुरुष - आदिपुरुष


4. 2.0 - 375 कोटी रुपयांत या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली. 


5. ब्रम्हास्त्र 


6. साहो - साहो हा चित्रपटही चांगलाच गाजला. या चित्रपटाची निर्मिती 350 कोटींमध्ये करण्यात आली आहे.


7. राधेश्याम - राधेश्याम चित्रपटाची निर्मिती 300 कोटी रुपयांत करण्यात आली आहे.


8. कंगुवा - कंगुवा या चित्रपटाची निर्मिती 300 कोटींमध्ये करण्यात आली आहे.


9. बाहुबली 2 - बाहुबली 2 या चित्रपटाची निर्मिती 250 कोटी रुपयांत करण्यात आली आहे.


10. 83 - रणबीर कपूरच्या 83 या चित्रपटाचं बजेट 225 कोटी रुपये होतं.


संबंधित बातम्या