Richa Chadha Drunk Dance : संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांच्या 'हीरामंडी' (Heeramandi) या वेबसीरिजला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. काही कलाकारांच्या अभिनयाचं कौतुक होत आहे. तर काहींना ट्रोल केलं जात आहे. या सीरिजची स्टारकास्ट खूप मोठी आहे. 'हीरामंडी' या सीरिजमध्ये ऋचा चड्ढा लज्जोच्या भूमिकेत आहे. तिच्या कामाचं प्रचंड कौतुक होत आहे. सीरिजमधील एका सीनसाठी ऋचा चड्ढाने दारूचं व्यसन केलं आहे. व्यसन केल्यानंतर ऋचा चड्ढा हँग झाली होती. त्यामुळे शूटिंगदेखील थांबवण्यात आलं होतं. एका सीनसाठी ऋचा चड्ढाने 30-40 टेक दिले आहेत.  


ऋचा चड्ढाने लज्जोच्या भूमिकेसाठी मेथड एक्टिंगचा अवलंब केला आहे. ऋचाला खऱ्या आयुष्यात दारूचं व्यसन नाही. पण 'हीरामंडी' सीरिजमधील एका सीनसाठी तिने व्यसन केलं आहे. व्यसन केल्यानंतर ऋचाचे हालहाल झाले होते. 


सीनसाठी प्यायली दारू...


झूमला दिलेल्या मुलाखतीत ऋचा चड्ढाने नशेत केलेल्या डान्स सीक्वेंसबद्दल भाष्य केलं आहे. ऋचा चड्ढा म्हणाली,"पहिल्याच दिवशी मला ड्रंक डान्स करायचा होता. मला या पद्धतीचा डान्स करणं जमत नव्हतं. 30-40 टेकनंतर मी विचार केला की एक क्वाटर पीते आणि मग काय होतं ते पाहू. मी थोडं व्यसन केलं. मी थोडं व्यसन केलं पण त्यामुळे गोष्टी आणखी बदलल्या. सीनमध्ये एक ग्रेस असावा असं मला वाटत होतं. व्यसन न करता व्यसनी दाखवणं ही कठीण बाब आहे. हा एक टेक्निकल जॉब आहे. भरजरी कपड्यात डान्स करणं माझ्यासाठी खूप मजेदार होतं". 


डान्स सीनसाठी दिले 99 टेक


ऋचा चड्ढाने आपल्या 'हीरामंडी' वेबसीरिजच्या प्रमोशनसाठी 'द ग्रेट इंडियन कपिल शो'मध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी ऋचाने आपल्या डान्स सीन्सबद्दल भाष्य केलं. ऋचा म्हणाली,"डान्स सीनसाठी मी 99 टेक दिले. लोकांना ही गोष्ट खूप सोपी वाटते. 200-300 नजरा तुमच्यावर आहेत आणि तुम्हाला एखादी गोष्ट करणं जमत नाही आणि अचानक तुम्ही ते जमवता तेव्हा तुम्हाला आनंद होतो. मी हे करू शकते, असं मला कधीच वाटलं नव्हतं. 


'हीरामंडी' या सीरिजमध्ये सोनाक्षी सिन्हा, मनीषा कोइराला, संजीदा शेख, शर्मिन सेगल, आदिती राव हैदरी, ऋचा चड्ढा, शेखर सुमन, फरदीन खान आणि अध्ययन सुमन हे सेलिब्रिटी झळकणार आहेत. नेटफ्लिक्सवर ही सीरिज झाली आहे.


संबंधित बातम्या


Sonakshi Sinha Heeramandi : सोनाक्षीसोबतचा 'तो' सीन अन् समोर तिची आई; हिरामंडीच्या 'उस्तादजी' म्हणाले, तिने पायानं...