मुंबई : ज्येष्ठ अभिनेत्री मौसमी चॅटर्जी यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. मौसमी यांना कन्येशी संबंधित वैद्यकीय कागदपत्रं पोहचवण्याचे आदेश कोर्टाने जावई डिकी सिन्हा यांना दिले आहेत. कोमात गेलेली कन्या पायल सिन्हाची जावयाने भेट घेऊ न दिल्याचा आरोप करत मौसमी चॅटर्जींनी हायकोर्टात धाव घेतली होती.
मौसमी चॅटर्जी आणि त्यांचे पती जयंत मुखर्जी यांना लावलेले आरोप तथ्यहीन असल्याचा दावा डिकी सिन्हा यांनी केला आहे. पत्नीची भेट घेण्यापासून सासू-सासऱ्यांना कधीही थांबवलं, असंही डिकी सिन्हा म्हणतात. इतकंच काय, ज्या दिवशी याचिका दाखल केली, त्याच दिवशी दोघांनी तिची भेट घेतल्याचा दावाही त्यांनी केला. सीसीटीव्ही फूटेज पुरावा असल्याचं सिन्हा यांनी सांगितलं.
'यापुढे जेव्हा-जेव्हा मौसमी आणि जयंत यांना मुलीची भेट घ्यायला यायचं असेल, त्यांनी खुशाल यावं. पती म्हणून मी पायलची व्यवस्थित काळजी घेतो. देखभालीसाठी प्रशिक्षित नर्सही ठेवली आहे' असं डिकी सिन्हा यांनी कोर्टात सांगितलं.
दोन्ही पक्षाच्या बाजू ऐकल्यानंतर कोर्टाने हे प्रकरण परस्पर सामंजस्याने सोडवण्याचे आदेश दिले. कुठलाही आक्षेप असल्यास पुन्हा कोर्टाचे दरवाजे ठोठावू शकता, असंही कोर्टाने सांगितलं.
पायल सिन्हा 2017 मध्ये कोमात गेल्या. एप्रिल 2018 मध्ये त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्या पतीच्या घरी आहेत. 2010 मध्ये पायल आणि डिकी सिन्हा यांचा विवाह झाला होता.
अभिनेत्री मौसमी चॅटर्जींना लेकीची माहिती द्या, कोर्टाचे जावयाला आदेश
अमेय राणे, एबीपी माझा, मुंबई
Updated at:
24 Nov 2018 03:51 PM (IST)
मौसमी चॅटर्जी आणि त्यांचे पती जयंत मुखर्जी यांना लावलेले आरोप तथ्यहीन असल्याचा दावा डिकी सिन्हा यांनी केला आहे. पत्नीची भेट घेण्यापासून सासू-सासऱ्यांना कधीही थांबवलं, असंही डिकी सिन्हा म्हणतात.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -