मुंबई : भारताला टी20 विश्वचषक जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारा क्रिकेटपटू हार्दिक पांड्याच्या आयुष्यात सध्या मोठी उलथापालथ झाल्याचं पाहायला मिळत आहे. हार्दिक पांड्या (Hardik Padya) त्याची मॉडेल पत्नी नताशा स्टॅनकोविक (Natasha Stankovic) एकमेकांपासून विभक्त झाले आहेत. मागील काही काळापासूनच यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या बातमी समोर येत होत्या. मात्र, आता अखेर या दोघांनी घटस्फोटाची घोषणा केली आहे. हार्दिक आणि नताशाने सोशल मीडियावर पोस्ट करत एकमेकांपासून वेगळे झाल्याचं जाहीर केलं आहे. 


हार्दिक पांड्या- नताशा स्टॅनकोविच घटस्फोट 


क्रिकेटर हार्दिक पांड्या आणि नतासा स्टॅनकोविक यांनी एकमेकांपासून वेगळे होण्याची घोषणा केली आहे. गुरुवारी संध्याकाळी दोघांनीही त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरुन निवेदन पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं आहे की, हा त्या दोघांसाठी एक कठीण निर्णय होता आणि परस्पर सहमतीने ते एकमेकांपासून विभक्त होत आहेत. त्यांच्या 3 वर्षाच्या मुलगा अगस्त्य याचा दोघे मिळून सांभाळ करतील, असं म्हटलं आहे.






मुलगा अगस्त्य कोणाकडे राहणार?


दरम्यान, हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविच त्यांच्या वैवाहिक आयुष्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत होते. त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याचं वारंवार बोललं जात होतं. यानंतर दोघांनी सोशल मीडियावर पोस्ट करत विभक्त झाल्याचं सांगितलं आहे. चार वर्षांच्या संसारानंतर आता दोघेही परस्पर सहमतीने विभक्त झाल्याचं त्यांनी निवेदनात म्हटलं आहे. हार्दिक-नताशाच्या घटस्फोटानंतर मुलगा अगस्त्य कुणाकडे राहणार असा प्रश्न अनेकांना पडला आहे.


घटस्फोटानंतर अगस्त्य कुणाकडे राहणार?


हार्दिक-नताशाने इंस्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलं आहे की, "आम्ही एक कुटुंब वाढवत असताना हा निर्णय घेणे आमच्यासाठी कठीण होते. आमचे आशीर्वाद नेहमीच अगस्त्यसोबत आहेत. त्याच्या आनंदासाठी आम्ही त्याला सर्व काही देण्याचा प्रयत्न करु आणि त्याचे पालक म्हणून जबाबदारी सांभाळू."


दोघेही मिळून मुलाचा सांभाळ करणार


हार्दिक-नताशाने इंस्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलं आहे की, "आम्ही एक कुटुंब वाढवत असताना हा निर्णय घेणे आमच्यासाठी कठीण होते. आमचे आशीर्वाद नेहमीच अगस्त्यसोबत आहेत. त्याच्या आनंदासाठी आम्ही त्याला सर्व काही देण्याचा प्रयत्न करु आणि त्याचे पालक म्हणून जबाबदारी सांभाळू." यानुसार, दोघेही मिळून मुलाचा सांभाळ करणार आहेत.


नताशा मुलगा अगस्त्यला घेऊन मायदेशी परतली


या दोघांनी आता घटस्फोटाची घोषणा केली आहे. मात्र या जोडप्याने विभक्त झाल्याची घोषणा करण्याआधीच नताशा मुलगा अगस्त्यला घेऊन मायदेशी परतली आहे. बुधवारी नताशा मुलगा अगस्त्यसोबत विमानतळावर दिसली. त्यानंतर तिने मायदेशी सर्बियाला परतल्यावर इंस्टाग्रामवर स्टोरीही शेअर केली होती. यावर सध्या अगस्त्य नताशासोबत असल्याचं स्पष्ट झालं आहे.


नताशाची इंस्टाग्राम स्टोरी


महत्त्वाच्या इतर बातम्या :


मोठी बातमी : हार्दिक-नताशाचा घटस्फोट, चार वर्षांनंतर संसार मोडला; पांड्याची भावनिक पोस्ट