Suriya Birthday : प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता सूर्या (Suriya) सध्या प्रचंड चर्चेत आहे. नुकतेच त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. अभिनेता सूर्या आज (23 जुलै) आपला वाढदिवस साजरा करत आहे. वाढदिवसाच्या अवघ्या एक दिवस आधीच त्याला मोठे गिफ्ट मिळाले आहे. आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करणाऱ्या सूर्याने इंडस्ट्रीत पाऊल ठेवण्यापूर्वी नोकरी केली होती. मात्र, अभिनयाचं बाळकडू त्याला घरातूनच मिळालं होतं.
अभिनेता सूर्याचे खरे नाव सर्वानन शिवकुमार असे आहे. सूर्या आपल्या अभिनयाच्या बळावर आज प्रसिद्ध अभिनेता बनला आहे. पण अभिनयाचा वारसा त्याला त्याच्या कुटुंबाकडूनच मिळाला आहे. सूर्या हा प्रसिद्ध तमिळ अभिनेते शिवकुमार यांचा मुलगा आहे आणि त्याचा भाऊ कार्तीही साऊथ चित्रपटांचा प्रसिद्ध चेहरा आहे.
दिग्दर्शक व्हायचे होते, पण...
वडील अभिनेते असले तरी, बालपणी सूर्याला मात्र अभिनयात अजिबात रस नव्हता. त्याला नेहमी एक दिग्दर्शक व्यायचे होते. मात्र, शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याने पहिला एखादी नोकरी करण्याचा निर्णय घेता आणि तो त्याच्या दिशेने पुढे जाऊ लागला होता. त्याने काही काळ एका गारमेंट फॅक्टरीत मॅनेजर म्हणून काम केले. आपण एका प्रसिद्ध अभिनेत्याचे पुत्र आहोत, याचा साधा उल्लेखही त्याने कधी कुठे केला नव्हता. मात्र, या नोकरीत त्याचे मन फारसे रमले नाही. अवघ्या काही महिन्यांतच त्याने ती नोकरी सोडली.
अभिनय विश्वात पदार्पण
1995मध्ये सूर्याला एक चित्रपट ऑफर करण्यात आला होता. मात्र, त्याने तो नाकारला. यानंतर त्याने 1997मध्ये 'नेररुक्कू नेर' या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण केले. मात्र, त्याला अभिनेता म्हणून खरी ओळख 'नंदा' या चित्रपटातून मिळाली. हा चित्रपट त्याच्या करिअरला कलाटणी देणारा ठरला. सुर्याने ‘कादल निम्माधी’, ‘कृष्णा’, ‘श्री’, ‘काका काका’, ‘सिंघम’, ‘निनातू यारो’, ‘अंजान’, ‘कल्याणरामन’, ‘24’, ‘जय भीम’, ‘सूरराय पोतरू’ यासह अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे.
एका चित्रपटाच्या सेटवर सूर्याची भेट अभिनेत्री ज्योतिका हिच्याशी झाली. या दरम्यान त्यांच्यात छान मैत्री झाली, या मैत्रीचं रुपांतर पुढे प्रेमात झालं आणि त्यांनी लग्नगाठ बांधली. आता ही जोडी दोन मुलांची पालक आहे.
हेही वाचा :
Jai Bhim : सूर्याच्या 'जय भीम'ने नोएडा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पटकावले तीन पुरस्कार
Movie Review : 'जय भीम'... सिनेमा नाही तर चळवळ!
Jai Bhim चित्रपटातील सीनवरुन वाद शिगेला, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल