Rakhi Sawant : बॉलिवूडची 'ड्रामा क्वीन' राखी सावंत (Rakhi Sawant) आज 42 वा वाढदिवस साजरा करत आहे. आपल्या बेधडक वक्तव्याबद्दल राखी कायम चर्चेत असते. राखीचे खरे नाव नीरू भेडा असं आहे. पण इंडस्ट्रीत आल्यानंतर तिने तिचं नाव बदललं आणि राखी सावंत असं ठेवलं. 


राखीला 'कॉन्ट्रोवर्सी क्वीन' असेही म्हटले जाते. कारण जगातील कोणत्याही गोष्टीवर तिला तिचं मत मांडायचं असतं. पण तिची मतं अनेकांना खटकतात. त्यामुळे वाद निर्माण होतो. राखी अभिनयासह नृत्यामुळे आणि अफेअरमुळे चर्चेत असते. राखीने राजकारणातही आपलं नशीब आजमावून पाहिले आहे. पण त्यातही तिला अपयशाचा सामना करावा लागला. 


'अग्निचक्र' या सिनेमाच्या माध्यमातून राखीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. राखीला बॉलिवूडमध्ये आपले स्थान मिळवण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे. सिनेसृष्टीत येण्यासाठी राखीने घरातूनच पैसे चोरले आणि पळून गेली होती. सुरुवातीला राखीला तिच्या दिसण्यामुळे नकाराचा सामना करावा लागला. त्यामुळे तिने तिचं रूप बदलण्यासाठी शस्त्रक्रिया केली. 






राखीला 'आयटम गर्ल' का म्हणतात?


'जोरू का गुलाम', 'जिस देश में गंगा रहा है' अशा अनेक सिनेमांत राखीने छोट्या-मोठ्या भूमिका केल्या आहेत. पण 2005 साली प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या 'परदेसिया' या गाण्याने राखी लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली. या गाण्यामुळे राखी 'आयटम गर्ल' म्हणून ओळखली जाऊ लागली. 


राखी सावंतने आजवर अनेक रिअॅलिटी शो केले आहेत. राखीने 2009 साली 'राखी का स्वयंवर' नावाचा एक खास रिअॅलिटी शो केला होता. या कार्यक्रमाच्या माध्यमातून राखी टोरंटोमधील एका स्पर्धकासोबत लग्नबंधनात अडकली होती. पण त्यांचं नातं फार काळ टिकलं नाही आणि ते विभक्त झाले. 


राखी सावंतची कमाई


आपल्या मेहनतीच्या जोरावर राखी आज कोट्यवधी रुपयांची मालकीण आहे. राखी सावंतची एकूण संपत्ती 37 कोटी असल्याचे म्हटले जाते. तसेच तिचे मुंबईत दोन फ्लॅट आणि एक बंगला आहे. या बंगल्याची किंमत 11 कोटी आहे. राखीला महागड्या कारचीदेखील आवड आहे. 


राखीने हिंदीसह, कन्नड, मराठी, तेलुगू आणि तामिळ सिनेमांतदेखील आपल्या अभिनयाची झलक दाखवली आहे. भाईजानच्या 'बिग बॉस'मध्येदेखील राखी सावंत स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. राखीला आयुष्यभर चर्चेत राहायला आवडतं. 


संबंधित बातम्या


Rakhi Sawant Net Worth : राखी सावंतची लग्झरी लाइफ, 37 कोटींच्या संपत्तीची मालकीण आहे राखी