Konkona Sen Sharma : बॉलिवूड अभिनेत्री कोंकणा सेन शर्मा (Konkona Sen Sharma) आज 42 वा वाढदिवस साजरा करत आहे. ती आजवर अभिनयासह वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहिली आहे. कोंकणाला आतापर्यंत दोन वेळा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
कोंकणाने वेगवेगळ्या भूमिका साकारल्या असल्या तरी तिची प्रत्येक भूमिका चाहत्यांच्या मनात घर करून आहे. अनेक सिनेमांत तिने नकारात्मक भूमिका साकारल्या आहेत.
कोंकणाचा 2006 साली 'ओंकारा' आणि 2007 साली 'लाइफ इन अ मेट्रो' हे दोन सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. या सिनेमातील तिच्या अभिनयाचं प्रचंड कौतुक झालं. या सिनेमांसाठी सलग दोन वर्ष तिला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
घरातच मिळाला अभिनयाचा वारसा
कोंकणाची आई एक उत्कृष्ट दिग्दर्शिका आणि अभिनेत्री होती. तिच्या आईचे नाव अपर्णा सेन आहे. तर तिचे वडील मुकुल शर्मा हे प्रसिद्ध पत्रकार होते. कोंकणाने बालकलाकार म्हणून मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं. 1983 साली प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या 'इंदिया' या बंगाली सिनेमात कोंकणा महत्त्वाच्या भूमिकेत होती. त्यानंतर 2002 साली प्रदर्शित झालेला तिचा 'तितली' सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला.
लग्नाआधीच प्रेग्नंट
कोंकणा 'आजा नच ले' हा कार्यक्रम करत होती. त्यावेळी या कार्यक्रमाच्या सेटवर तिची ओळख अभिनेता रणवीर शौरीबरोबर झाली. पुढे त्यांची छान मैत्री झाली आणि त्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. 2007 पासून ते एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर 3 सप्टेंबर 2010 साली ते लग्नबंधनात अडकले आणि 15 मार्च 2011 साली कोंकणाला मुलगा झाला. त्यामुळे ती लग्नाआधीच प्रेग्नंट असल्याचं म्हटलं जातं. लेकाच्या जन्मानंतर त्यांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही आणि 2015 साली ते विभक्त झाले. पतीपासून विभक्त झाल्यापासून कोंकणा लेकाचा सांभाळ करत आहे.
कोंकणाच्या गाजलेल्या भूमिका
कोंकणाला अनेक पुरस्कारांना सन्मानित करण्यात आले आहे. 'पेज 3' या सिनेमाने तिला वेगळी ओळख मिळाली. या सिनेमातील माधवी शर्मा, 'लिपस्टिक अंडर माय बुर्खा' सिनेमातील शिरीन असलम, 'अजीब दास्तान'मधली भारती मंडल या कोंकणाच्या भूमिका चांगल्याच गाजल्या आहेत.
संबंधित बातम्या