Dharmendra : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) यांचा आज वाढदिवस आहे. धर्मेंद्र हे हिंदी सिनेसृष्टीतील सर्वात सुंदर आणि देखणे अभिनेते आहेत. 'अॅक्शन हीरो' म्हणून त्यांनी स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. धर्मेंद्र यांनी आज 87 वर्षात पदार्पण केलं आहे. 


मायानगरी सोडण्याचा घेतला होता निर्णय...


आज धर्मेंद्र एक उत्कृष्ट अभिनेते आणि सिने-निर्माते असले तरी त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. धर्मेंद्र यांना त्यांच्या करिअरच्या सुरुवातील सिनेसृष्टीत यश मिळत नसल्याने त्यांनी मुंबई सोडून पुन्हा पंजाबला आपल्या मुळ गावी जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी ट्रेनदेखील पकडली होती. धर्मेंद्र आणि मनोज कुमार चांगले मित्र होते. धर्मेंद्र परत जात असल्याचे मनोज कुमार यांना समजल्यानंतर त्यांनी लगेचच स्टेशन गाठलं. धर्मेंद्र यांना भेटून समजावलं. 


धर्मेंद्र यांनी 1960 साली अर्जुन हिंगोरानीच्या 'दिल भी तेरा हम भी तेरे' (Dil Bhi Tera Hum Bhi Tere) या सिनेमाच्या माध्यमातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं. या सिनेमासाठी त्यांना 51 रुपये मानधन मिळालं होतं. त्यानंतर त्यांनी मागे वळून कधीच पाहिलं नाही. आजवर त्यांनी एकापेक्षा एक हिट सिनेमांत काम केलं आहे. धर्मेंद्र यांनी अभिनयासह सिनेनिर्मिती क्षेत्रातही उत्तम कामगिरी केली आहे. आजही ते तितकेच अॅक्टिव्ह आहेत. 


धर्मेंद्र यांचे सिनेमे चाहते आजही आवडीने पाहतात. त्यांनी व्यावसायिक सिनेमांपासून सामाजिक विषयांपर्यंत अनेक सिनेमे केले आहेत. धर्मेंद्र यांचे सिनेमे बॉक्स ऑफिसवर चांगलं कलेक्शन करत असल्याने निर्मातेदेखील आपल्या सिनेमासाठी धर्मेंद्र यांनांच विचारत असे. त्यांचे काही सिनेमे 100 आठवड्यांपेक्षा अधिक दिवस चालले आहेत. पण तरीदेखील धर्मेंद्र आजही पब्लिसिटीपासून दूर आहेत. 


'अॅक्शन हीरो' असण्यासोबत धर्मेंद्र रोमॅंटिक सिनेमाचा बादशहा होते. त्यांचं नाव बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रींशी जोडलं गेलं होते. तसेच त्यांच्या अफेअर्सच्या चर्चाही रंगल्या होत्या. 'धर्मेंद्र' यांचे पूर्ण नाव धरम सिंह देओल (Dharam Singh Deol) असे आहे. पण ते 'धर्मेंद्र' याच नावाने परिचित आहेत. 


धर्मेंद्र-हेमा मालिनी लव्हस्टोरी (Dharmendra - Hema Malini Love Story) 


धर्मेंद्र-हेमा मालिनी (Hema Malini) यांची पहिली भेट 'तुम हसीन मैं जवान' (Tum Haseen Main Jawaan) या सिनेमाच्या सेटवर झाली होती. या सिनेमाच्या सेटवरच त्यांची मैत्री झाली आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडले. हेमा मालिनी यांच्यासोबत लग्न करण्यासाठी त्यांनी इस्लाम धर्म स्वीकारला होता. त्यांनी 1980 मध्ये लग्न केलं.


संबंधित बातम्या


BLOG : 'धर्मेंद्र' सगळ्यात यशस्वी नायक, पण पब्लिसिटी अभावी पिछाडीवर