Bobby Deol: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता बॉबी देओलचा (Bobby Deol) आज 54वा वाढदिवस. 27 जानेवारी 1969 रोजी बॉबी देओलचा जन्म झाला. बॉबीच्या गुप्त (Gupt), अजनबी (Ajnabi), बिच्छू (Bichchoo) आणि हमराज (Humraz) या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. बॉबीचे वडील धर्मेंद्र (Dharmendra) हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते आहेत. तर त्याचा भाऊ सनी देओल देखील अभिनयक्षेत्रात काम करतो. बॉबीचे चाहते त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात.  जाणून घेऊयात बॉबीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल...


बॉबी देओल नाही तर हे आहे खरं नाव
अनेकांना माहीत नसेल, बॉबी देओलचं खरं नाव हे विजय सिंह देओल आहे. पण मनोरंजनक्षेत्रात तो बॉबी देओल या नावानेच ओळखला जातो. 


बालकलाकार म्हणून केलं काम
बरसात या चित्रपटामधून बॉबीनं बॉलिवूडमध्ये पादार्पण केलं, हे अनेकांना माहीत आहे. पण त्यानं त्या आधी चित्रपटांमध्ये बालकलाकार म्हणून देखील काम केलं आहे. त्यानं धर्मवीर या चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केलं. 


'या' क्षेत्रातही आहे पारंगत
बॉबी देओल मोटरसायकल रायडर आहे. चित्रपटातील अनेक स्टंट त्यानं स्वत: केले आहेत. तसेच त्यानं प्रोफेशनल डिजेचं देखील ट्रेनिंग घेतलं आहे. त्यानं काही वेळा डिजे म्हणून देखील काम केलं. डिजे आणि मोटरसायकल रायडर या व्यतिरिक्त बॉबीनं प्लेन उडवायचे देखील ट्रेनिंग घेतले आहे. त्याच्याकडे खाजगी पायलट परवाना (PPL) देखील आहे. 


बॉबी देओलने 1996 मध्ये तान्या आहुजासोबत लग्न केले. बॉबी आणि तान्या मुंबईतील एका कॅफेमध्ये भेटले त्यानंतर काही काळानं त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. तान्या आहुजा फॅशन डिझायनर आहे.


बॉबीची संपत्ती


बॉबी देओल हा एका चित्रपटासाठी दोन ते चार कोटींचे मानधन घेतो. तसेच बॉबीची मुंबईमध्ये सुहाना आणि समप्लेस एल्स नावाचे दोन चायनिज रेस्टॉरंट्स आहेत.   बॉबीचे मुंबईमधील जुहू भागात आलिशान घर आहे. ज्याची किंमत जवळपास आठ कोटी रुपये आहे. तसेच त्याचं एक फार्म हाऊस देखील आहे. 


बॉबी देओलचे आगामी चित्रपट






हरि हरा वीरा मल्लू, अॅनिमल, श्लोक-द देसी शेरलॉक, अपने 2,  हाउसफुल 5 या आगामी चित्रपटांमधून बॉबी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तसेच त्याची  आश्रम 4 ही वेब सीरिज देखील प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे, असं म्हटलं जात आहे. 






महत्वाच्या इतर बातम्या : 


Bobby Deol : आलिशान घर, लग्झरी गाड्या अन् रेस्टॉरंट; बॉबी देओल आहे कोट्यवधींचा मालक