Pathaan Worldwide Box Office Collection: तब्बल 4 वर्षानंतर शाहरुख खानने मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. 'पठाण' देशातच नव्हे तर जगात कमाईचे नवे विक्रम करत आहे. चित्रपटाच्या एका दिवसाच्या कमाईबद्दल बोलायचे झाले तर, चित्रपटाने जवळपास 106 कोटींचा आकडा पार केला आहे. परदेशी प्रदेशांमध्ये पहिल्या दिवशी पठाणने हिंदी चित्रपटासाठी उत्तर अमेरिका, युनायटेड किंगडम आणि आयर्लंड, ऑस्ट्रेलिया, U.A.E, G.C.C, जर्मनी, स्वीडन, रशिया, CIS, फिनलंड आणि नेपाळमध्ये आतापर्यंतचा सर्वात मोठा ओपनिंग डे (Movie Opening Day Records) ठरला आहे.


Pathaan Worldwide Box Office Collection: 'अवतार'वर पठाण भारी 


पहिल्या दिवसाच्या कमाईच्या बाबतीत पठाणने 'अवतार : द वे ऑफ वॉटर'लाही (Avatar : The Way Of Water ) मागे टाकलं आहे. जगभरात पहिल्याच दिवशी अवतारने 10.50 मिलियनची कमाई केली होती. तर पठाणने 13.00 मिलियनची कमाई केली आहे.    






Pathaan Box Office Collection: पठाणने देशभरात 67 कोटी रुपयांची केली कमाई 


'पठाण'च्या ऑल इंडिया ग्रॉस कमाईबद्दल बोलायचे झाले तर, चित्रपटाने जवळपास 67 कोटींची कमाई केली आहे. पीव्हीआर, आयनॉक्स आणि सिनेपोलिसने पहिल्या दिवशी 27.05 कोटी रुपयांची कमाई केली आहे, जे एकूण कलेक्शनच्या जवळपास 50 टक्के आहे. प्रजासत्ताक दिनाच्या सुट्टीमुळे पठाणच्या दुसऱ्या दिवशी कलेक्शनमध्ये आणखी मोठी वाढ दिसू शकते. फक्त दोन दिवसात कमाईच्या बाबतीत पठाण सर्व चित्रपटांचे रेकॉर्ड मोडू शकतो. सुट्टी नसलेल्या दिवशी पठाणने वॉर, KGF 2 आणि ठग्स ऑफ हिंदोस्तान यांसारख्या हॉलिडे रिलीजच्या कलेक्शनला मागे टाकत हिंदीमध्ये पहिल्या क्रमांकाची ओपनिंग मिळवली आहे.


जगभरात 106 कोटींची ओपनिंग


शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम अभिनीत चित्रपटाने जगभरात ओपनिंग डे सुमारे 106 कोटी रुपयांचे कलेक्शन केले, एका दिवसात जागतिक बॉक्स ऑफिसवर शतक ठोकणारा हा पहिला बॉलिवूड चित्रपट बनला. पठाण हा 8000 हून अधिक स्क्रीन्सवर जगभरात रिलीझ झाला.  






 


इतर महत्वाची बातमी:


Deepak Kesarkar on Deepak Kesarkar : बाळासाहेबांचा वारसा गेला, आता काँग्रेसचा वारसा घेतला आहे, उद्धव ठाकरे स्वतः मिंधे; दीपक केसरकरांचा हल्लाबोल