Abhishek Bachchan Birthday Special: बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) आज (5 फेब्रुवारी) 46 वर्षांचा झाला आहे. अभिषेक बच्चनने 'रिफ्युजी' चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री करीना कपूर मुख्य भूमिकेत दिसली होती. हा चित्रपट फ्लॉप ठरला असेल, पण या जोडीला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. फिल्मी करिअरसोबतच अभिषेक बच्चनच्या लव्ह लाईफचीही खूप चर्चा झाली. ऐश्वर्या रायशी लग्नापूर्वी अभिषेक बच्चनचे अनेक अभिनेत्रींशी नाव जोडले गेले होते.


करिश्मा कपूर


अभिषेक बच्चन आणि करिश्मा कपूर यांच्या लव्हस्टोरीची आजही संपूर्ण इंडस्ट्रीत चर्चा आहे. रिपोर्ट्सनुसार, दोघांचा साखरपुडाही झाला होता, पण काही कारणांमुळे दोघांचे नाते तुटले. दोघांनीही अनेक चित्रपटात एकत्र काम केले होते.


राणी मुखर्जी


राणी मुखर्जी आणि अभिषेक बच्चन यांनी 'कभी अलविदा ना कहना', 'बंटी और बबली' आणि 'युवा' सारख्या चित्रपटात एकत्र काम केले होते. असे म्हटले जाते की, चित्रपटांच्या शूटिंगदरम्यान दोघेही एकमेकांच्या जवळ आले होते. मात्र, दोघांनीही त्यांच्या नात्याचा जाहीर खुलासा केला नाही.


दीपनिता शर्मा


अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री दीपनिता शर्मा जवळपास 10 महिने एकमेकांना डेट करत होते. मात्र, त्यांचे नाते फार काळ टिकले नाही आणि नंतर दोघेही वेगळे झाले.


जान्हवी कपूर


जान्हवी कपूर नावाच्या एका मुलीने अभिषेक बच्चनवर फसवणुकीचा आरोप केला होता. एवढेच नाही तर, या तरुणीने आत्महत्येचा प्रयत्नही केला होता. या घटनेलानंतर पब्लिसिटी स्टंट म्हटले गेले.


ऐश्वर्या राय


'और प्यार हो गया' चित्रपटाच्या सेटवर अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांची भेट झाली होती. यानंतर अभिषेक आणि ऐश्वर्याने अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आणि कामासोबतच त्यांची लव्हस्टोरीही सुरू झाली. 2007 मध्ये दोघांनी एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. अभिषेक आणि ऐश्वर्याला एक मुलगी आहे.


हेही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha