Hansal Mehta on Laapataa Ladies : किरण रावचा (Kiran Rao) 'लापता लेडीज' (Laapataa Ladies) हा सिनेमा भारताकडून अधिकृतरित्या ऑस्करच्या शर्यतीसाठी पाठवण्यात आला होता. पण ऑस्कर पुरस्कारांमध्ये पहिल्याच फेरीतून हा सिनेमा बाहेर पडला आहे. त्यानंतर आता दिग्दर्शक हंसल मेहता (Hansal Mehta ) यांनी फिल्म फेड्रेशनच्या निवडीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. लापता लेडीजची निवड झाली त्याचवेळी अनेकांनी ही निवड चुकली असल्याचं मत व्यक्त केलं होतं. पण आता ऑस्करच्या शर्यतीत पहिल्याच फेरीतून हा सिनेमा बाद झाला आहे.
हंसल मेहता यांनी एक्स पोस्ट करत फिल्म फेड्रेशनवर ही नाराजी व्यक्त केलीये. त्यामुळे ऑस्करच्या शर्यातीसाठी भारताची निवड खरंच चुकली का असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित केला जातोय. विशेष म्हणजे युनाटेड किंगडमकडून ऑस्करच्या शर्यतीत पाठवण्यात आलेल्या एका हिंदी सिनेमाला ऑस्करमध्ये नामांकन मिळालं आहे.
हंसल मेहता यांची पोस्ट काय?
हंसल मेहता यांनी पोस्ट करत म्हटलं की, फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाने पुन्हा तेच केलं. त्यांचा स्ट्राइक रेट आणि वर्षानुवर्षे चित्रपटांची निवड ही चुकीची आहे. हंसल मेहता यांच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स करत त्यांच्या या मताशी सहमती दर्शवली आहे. दरम्यान ऑस्करच्या शर्यतीसाठी भारताकडून पायल कपाडियाच्या 'ऑल वुई इमॅजिन ॲज लाईट' या सिनेमाची निवड व्हायला हवी होती, असंही अनेकांचं मत आहे.
त्या हिंदी सिनेमाची निवड
अॅकडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सनं बुधवारी, 18 डिसेंबर रोजी ऑस्कर 2025 च्या शर्यतीतील चित्रपटांची यादी प्रसिद्ध करण्यात आली. यामध्ये 10 विविध विभागांमध्ये नॉमिनेश मिळालं आहे. पण यादीमध्ये भारताच्या लापता लेडीज सिनेमाचं नाव आहे. त्यामुळे लापता लेडीज सिनेमा ऑस्करच्या शर्यतीमधून बाहेर पडल्याचं स्पष्ट झालं. पण यामध्ये युनाटेड किंगडम देशाकडून पाठवण्यात आलेला संतोष हा हिंदी भाषेतील सिनेमा 'सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म'साठी निवडण्यात आला आहे.