Gumraah BO Collection Day 1: अभिनेता आदित्य रॉय कपूरचा (Aditya Roy Kapur) ‘गुमराह’ (Gumraah) हा चित्रपट काल (7 एप्रिल) प्रेक्षकांच्या भेटीस आला.या चित्रपटात अभिनेता आदित्य रॉय कपूरचा डबल रोल केला आहे. आदित्य रॉय कपूरसोबतच या चित्रपटात मृणाल ठाकुरनं (Mrunal Thakur) देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. हा पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करेल, असा अंदाज लावला जात होता. जाणून घेऊयात या चित्रपटाच्या कलेक्शनबाबत...
रिपोर्टनुसार, ‘गुमराह’ या चित्रपटानं रिलीज झाल्यानंतर पहिल्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी (7 एप्रिल) 1.50 कोटींची कमाई केली. 'गुमराह' हा तामिळ चित्रपट 'थडम' चा (Thandam) हिंदी रिमेक आहे.या चित्रपटात अभिनेता आदित्य रॉय कपूर, मृणाल ठाकूर आणि रोनित रॉयनं प्रमुख भूमिका साकारली. वर्धन केतकर यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन आहे. 50 कोटींच्या बजेटमध्ये ‘गुमराह’ या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे.
'गुमराह' चे कथानक
'गुमराह' हा सिनेमा गुन्हेगारीवर आधारित आहे. रोनी आणि अर्जुन या दोन जुळ्या भावांवर भाष्य करणारा हा सिनेमा आहे. रोनी हा एक गुन्हेगार आहे. तर अर्जुन एक यशस्वी उद्योगपती आहे. दोघेही एकमेकांच्या विरोधात आहेत. दोघांच्याही मनात एकमेकांविषयी कटुता आहे. एका मर्डरने सिनेमात ट्वीस्ट येतं. पोलीस आदित्य रॉय कपूरला पकडतात.
पठाण, तू झूठी मैं मक्कार आणि भोला या चित्रपटांना सोडून 2023 मध्ये प्रदर्शित झालेल्या काही चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली नाही. अक्षय कुमारचा ‘सेल्फी’, कार्तिक आर्यनचा ‘शहजादा’ हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले. आता ‘गुमराह’ हा चित्रपट बॉक्सवर हिट ठरतो की फ्लॉप? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
आदित्य रॉय कपूरचे चित्रपट
आदित्य रॉय कपूरनं अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. ओके जानू, दावत ए इश्क आणि फितूर हे आदित्यचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले होते. 2013 मध्ये प्रदर्शित झालेल्या आशिकी-2 या चित्रपटामधून आदित्यनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या चित्रपटामधील त्याच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं. त्याचा लूडो हा चित्रपट ओटीटीवर रिलीज झाला होता.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Gumraah Movie Review : गुन्हेगारीवर भाष्य करणारा आदित्य रॉय कपूरचा 'गुमराह'