Pushpa 2: सुपरस्टार  अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) पुष्पा-2 (Pushpa 2) या चित्रपटाची त्याचे चाहते उत्सुकतेने वाट बघत आहेत. पुष्पाः2 (Pushpa 2) चित्रपटाचा एक खास व्हिडीओ  चित्रपटाच्या निर्मात्यांनी शेअर केला होता.  या व्हिडीओमध्ये पुष्पा तुरुंगातून फरार होऊन जंगलामध्ये गेलेला दिसला. आता नुकताच अल्लू अर्जुननं सोशल मीडियावर त्याचा पुष्पा-2 चित्रपटातील लूकचा फोटो शेअर केला आहे. फोटोमधील अल्लू अर्जुनच्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

Continues below advertisement

पुष्पा-2 या चित्रपटातील लूकचा फोटो अल्लू अर्जुननं ट्विटरवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये तो खास लूकमध्ये दिसत आहे. फोटोमध्ये अल्लू अर्जुनच्या गळ्यात लिंबाची माळ दिसत आहेत. तसेच या फोटोमध्ये त्यानं भरजरी साडी देखील नेसलेली दिसत आहे. कानात झुमके, हातात बांगड्या अन् गळ्यात ज्वेलरी अशा अल्लू अर्जुनच्या लूकनं त्याच्या चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स करुन अल्लू अर्जुनच्या या लूकचे कौतुक केले आहे.

पाहा अल्लू अर्जुनचा लूक

 काही दिवसांपूर्वी पुष्पा-2 या चित्रपटामधील अभिनेत्री रश्मिका मंदानाचा लूक रिव्हिल करण्यात आला होता. रश्मिकानं पुष्पा चित्रपटाच्या पहिल्या भागात श्रीवल्ली ही भूमिका साकारली होती. 

पुष्पा द राइज (Pushpa: The Rise - Part 1) हा चित्रपट 2021 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. पुष्पा द राइज  चित्रपटातील श्रीवल्ली आणि पुष्पाच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांची पसंती मिळाली. आता अल्लू अर्जुनचे चाहते पुष्पाः2 म्हणजेच पुष्पा द रुल (Pushpa: The Rule) या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहेत. पुष्पा चित्रपटाच्या पहिल्या भागामध्ये अल्लु अर्जुन, रश्मिका मंदाना, फहाद फासिल, जगदीश, अजय घोष, सुनील आणि अनसूया या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली. 

'पुष्पा: द राइज' मधील गाणी आणि डायलॉग्स ठरले हिट

पुष्पा चित्रपटाच्या पहिल्या भागातील श्रीवल्ली,सामी सामी,ओ अंटवा  या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली.  'मैं झुकेगा नहीं साला', 'फ्लावर नहीं फायर है'  या पुष्पा चित्रपटामधील डायलॉग्सनं तर प्रेक्षकांना वेड लावलं. 

पुष्पा-2 मध्ये काही बॉलिवूडमधील कलाकार देखील काम करणार आहेत, असं म्हटलं जात आहे. या चित्रपटात सलमान खान आणि अजय देवगण हे महत्वाची भूमिका साकारतील, असंही म्हटलं जात आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Pushpa 2:  तुरुंगातून फरार झालेला पुष्पा कुठं गेलाय? उत्तर मिळालं, पाहा पुष्पा-2 चा अंगावर शहारे आणणारा व्हिडीओ