चंदीगड : 'पद्मावती' सिनेमाबाबत गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरु असताना आता हरियाणातील भाजप नेत्यानं याबाबत आणखी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. 'मी कोणालाही पद्मावती सिनेमा पाहू देणार नाही.' असं वक्तव्य हरियाणातील भाजपचे नेते सूरजपाल अमू यांनी केलं. या सिनेमात राणी पद्मावतीची भूमिका चुकीच्या पद्धतीनं साकारण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे.
या सिनेमाला त्यांनी विरोध केला असून याबाबत पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, 'मी हा सिनेमा पाहू इच्छित नाही. पण मी दुसऱ्या कुणालाही हा सिनेमा पाहू देणार नाही. जर तुम्ही याला दादागिरी समजणार असाल तरीही मला काहीही फरक पडणार नाही.'
'या सिनेमाचा ट्रेलर टीव्हीवर आणि चित्रपटगृहातही दाखवला जात आहे. या ट्रेलरमध्ये ज्या पद्धतीची दृश्य दाखवण्यात आली आहेत ते सांगण्यास मला लाज वाटते.' असंही ते म्हणाले.
'हा सिनेमा दाखवल्यास देशातील सर्व चित्रपटगृहं उद्ध्वस्त करु.' अशी धमकीही त्यांनी यावेळी दिली.
याआधीही सूरजपाल यांनी या सिनेमाबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानं भाजपकडून त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती.
दरम्यान, सूरजपाल हे उघड-उघड असं वक्तव्य करत असल्यानं त्यांच्यावर शासन काय कारवाई करणार? असाही प्रश्न आता विचारण्यात येत आहे.
'मी कोणालाही पद्मावती सिनेमा पाहू देणार नाही', भाजप नेत्याचं वक्तव्य
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
22 Nov 2017 05:52 PM (IST)
'मी हा सिनेमा पाहू इच्छित नाही. पण मी दुसऱ्या कुणालाही हा सिनेमा पाहू देणार नाही. जर तुम्ही याला दादागिरी समजणार असाल तरीही मला काहीही फरक पडणार नाही.'
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -