मुंबई : बॉलिवूडचा ‘हिरो नंबर वन’ म्हणून ओळखला जाणारा ज्येष्ठ अभिनेता गोविंदा (Govinda) आता पूर्णपणे बरा झाला आहे. तब्येत बिघडल्याने त्याला काही काळासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, मात्र डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार घेतल्यानंतर तो आता घरी परतला आहे. रुग्णालयातून बाहेर पडताना गोविंदाने माध्यमांशी संवाद साधला आणि चाहत्यांना आपल्या तब्येतीबद्दल माहिती दिली.
रुग्णालयाबाहेर गोविंदा काळ्या टी-शर्टमध्ये, मरून जॅकेट, जीन्स आणि काळ्या गॉगलमध्ये दिसला. त्यांच्या या स्टायलिश लुकने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले. अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने गोविंदाला रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं. ही घटना घडली त्यावेळी गोविंदाच्या पत्नी सुनीता एका लग्नासाठी शहराबाहेर होत्या, तर मुलगी टीना आहुजा चंदीगडमध्ये कामानिमित्त होती. त्यामुळे त्या क्षणी मित्रच त्यांच्या सोबत होते.
Govinda Health Update : योग आणि प्राणायम हेच उत्तम
हसऱ्या चेहऱ्याने नेहमीप्रमाणे उत्साही दिसणाऱ्या गोविंदाने पापाराझींना सांगितलं की, “मी आता चांगला आहे. थोडं जास्त काम आणि मेहनत केल्यामुळे थकवा आला होता. मला असं वाटतं की योग-प्राणायाम हेच सर्वात उत्तम आहे. हेवी एक्सरसाइज करणं कठीण असतं. मी प्रयत्न करत होतो की माझी पर्सनॅलिटी आणखी चांगली दिसावी, पण आता जाणवलं की योग आणि प्राणायाम केल्यानेच खरं संतुलन मिळतं.”
गोविंदाचे जिवलग मित्र ललित यांनी त्यांच्या तब्येतीबाबत सांगितले की, “मंगळवारी मध्यरात्री गोविंदाची तब्येत अचानक बिघडली. त्यांनी फॅमेली डॉक्टरांना फोन करून औषध घेतलं, पण रात्री 12 वाजता श्वास घेण्यात त्रास होऊ लागला. त्याने मला फोन केला आणि आम्ही लगेच त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं.”
डॉक्टरांच्या मते, गोविंदाला गंभीर काही झाले नाही, तर फक्त थकवा आणि ओव्हरवर्कमुळे ही स्थिती निर्माण झाली. काही तासांच्या विश्रांतीनंतर आणि उपचारांनंतर तो लगेच बरा झाला.
Govinda Discharged From Hospital : धमेंद्र यांची भेट घेतल्यानंतर घटना
अलीकडेच गोविंदा ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना भेटायला गेला होता. त्याच्या दुसऱ्या दिवशीच त्याला रुग्णालयात भरती करावं लागलं. धर्मेंद्र यांनाही आता डिस्चार्ज देण्यात आलं असून त्यांच्यावर घरात उपचार सुरू आहे.
Govinda Message : गोविंदाचा चाहत्यांना संदेश
“मी आता पूर्णपणे ठणठणीत आहे. सर्वांनी दाखवलेल्या काळजीबद्दल आणि प्रेमाबद्दल मनःपूर्वक आभार. थोडं कमी काम आणि थोडं जास्त योग, एवढंच आता जीवनाचं सूत्र ठेवणार आहे.” असा संदेश गोविंदाने त्याच्या चाहत्यांना दिला.
ही बातमी वाचा: