Girija Oak Blue Saree Photos Viral: सध्या सोशल मीडियावर (Social Media) एका निळ्या साडीतल्या सौंदर्यवतीचे फोटो व्हायरल होत आहेत. प्रत्येकजण तिच्या फोटोंवर बोलत आहेत. तसेच, त्या फोटोत दिसणारी 'ती' नेमकी कोण? याच्या चर्चा सुरू आहेत. अशातच अनेक चाहते पुढे येऊन तिची ओळख सांगत आहेत. अशातच जिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ती दुसरी-तिसरी कुणी नसून मराठमोळी अभिनेत्री गिरीजा ओक (Girija Oak) आहे. 

Continues below advertisement


मराठी अभिनेत्री (Marathi Actress) गिरीजा ओक अचानक ट्विटरवर ट्रेंड झाली. गिरीजानं फोटोमध्ये निळी साडी आणि स्लीवलेस ब्लाउज वेअर केला आहे. तिच्या फोटोंनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. एका हिंदी युट्यूब चॅनलवर नुकताच गिरीजानं एक इंटरव्यू दिला. या इंटरव्यूची क्लिप तिच्या आकर्षक आणि सहज अंदाजानं लोकांना हैराण करतेय. 


नेटकऱ्यांनी विचारलं, आहे कोण ही? 


गिरीजा ओकचे फोटो व्हायरल झाल्यानंतर तिला अनेकांनी विचारलं की, ही नेमकी आहे कोण? तसेच, सोशल मीडियावर तिच्यासाठी आकर्षक कॅप्शन दिले गेले. एवढंच नाहीतर तिची तुलना साऊथ इंडियन अभिनेत्रींशीही केली गेली. बघता बघता गिरीजा ओक ट्विटरवर ट्रेंडमध्ये आली. युजर्सनी गुगल आणि इन्स्टाग्रामवर तिचं नाव सर्च करायला सुरुवात केली. 


अमेरिकन अभिनेत्रीशी तुलना 


सोशल मीडियावर ट्रेंडिंग करणारी 'निळ्या साडीतली महिला' म्हणजे, अभिनेत्री गिरीजा ओक-गोडबोले, जिची सोशल मीडियावरील काही चाहते अमेरिकन अभिनेत्री सिडनी स्वीनी आणि इटालियन मॉडेल मोनिका बेलुचीशी तुलना करत आहेत आणि तिला 'भारत का जवाब' असं म्हणत आहेत. तर, अनेकांनी तिला 'नवी नॅशनल क्रश' असं म्हटलं आहे. गिरीजा दोन दशकांपासून मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत काम करतेय.


पहिल्यांदाच व्हायरल होण्याबद्दल बोलताना, गिरीजानं नुकतं एचटी वृत्तपत्राला प्रतिक्रिया दिली आहे. गिरीजा ओक म्हणाली की, "मला धक्का बसला! रविवारी संध्याकाळी माझा फोन जोरात वाजू लागला. मी माझ्या नाटकाची रिहर्सल करत होते आणि कॉल रिसीव्ह करू शकले नाही. अचानक, माझ्या सर्व मित्रांनी मला मेसेज करायला सुरुवात केली, 'तुला माहिती आहे का एक्स वर काय चाललंय?"






"कोणीतरी मला एक पोस्ट पाठवली, जिथे वादविवाद सुरू होता की, ती (अभिनेत्री) प्रिया बापट आहे की मी! मग माझ्या दिरानं मला सांगितलं की, काही अश्लील हँडलनी माझे फोटो काढले आहेत आणि संपूर्ण 'भाभी प्रेमी' दृश्य दाखवत आहेत. काही पेजनी मला कामुक बनवून टाकलं. पण मराठी चाहते म्हणाले, 'तुम्ही तिला नुकतंच शोधून काढलंय, आम्ही तिला वर्षानुवर्ष ओळखतोय..." जेव्हा एक्स वर मीम्सचा पूर सुरू झाला, तेव्हा गिरीजा अगदी सहजपणे म्हणाली की, "मी जे काम करते, ते इथेच राहील. जर लोकांना आता माझं काम कळलंय, तर मी खरंच खूप आनंदी आहे..."


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Prajakta Mali Left Mumbai: 'बाय बाय मुंबई, लवकरच...'; प्राजक्ता माळीनं मुंबई सोडली? अभिनेत्रीची पोस्ट पाहून चाहत्यांची चिंता वाढली