Upcoming Film TEST : बॉक्स ऑफिसवर (Box Office) ब्लॉकबस्टर ठरलेला शैतान (Shaitaan) चित्रपटाचा खलनायक आर. माधवन (R. Madhavan) आणि जवानची नायिका नयनतारा (Nayanthara) या दोघांचा मोस्ट अवेटेड चित्रपट 'टेस्ट' (Test) लवकरच प्रदर्शित होणार आहे. चाहते कित्येक दिवसांपासून या चित्रपटाची वाट पाहत आहेत. पण, जर तुम्ही मस्तपैकी मोठ्या पडद्यावर हा चित्रपट पाहण्याचा प्लान करत असाल, तर तुम्हाला प्लानमध्ये थोडासा बदल करावा लागेल. कारण आता हा बहुप्रतिक्षित चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित न होता, थेट ओटीटीवर रिलीज होणार आहे.
जवान चित्रपटाची नायिका नयनतारा आणि शैतान चित्रपटाचा मुख्य खलनायक आर. माधवन यांचा आगामी चित्रपट टेस्ट हा चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार नाही, तर थेट OTT प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. टेस्ट चित्रपटाचं संपूर्ण शूटिंग गेल्या वर्षीच पूर्ण झालं होतं. तेव्हापासून चाहते या चित्रपटाकडे डोळे लावून बसले होते. पण, आता हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. पण थिएटरमध्ये नाहीतर थेट ओटीटीवर रिलीज केला जाणार आहे.
'टेस्ट'मध्ये तगडी स्टार कास्ट
'टेस्ट' चित्रपट एक स्पोर्ट्स ड्रामा असलेला तमिळ चित्रपट आहे. आर. माधवन आणि नयनतारा चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. तर, यामध्ये सिद्धार्थ आणि मीरा जस्मिन यांसारखे अॅक्टर्स लीड रोलमध्ये दिसतील. या चित्रपटाचं दिग्दर्शन एस. शशिकांत यांनी केलं आहे. काही दिवसांपूर्वी माधवननं चित्रपटाचं मोशन पोस्टर शेअर करून लवकरच रिलीज होणार असल्याची गोड बातमी दिली होती.
'टेस्ट'ची स्टोरी काय?
एस. शशिकांत यांचं दिग्दर्शनातील हे पहिलं पाऊल आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा एक स्पोर्ट्स ड्रामा चित्रपट आहे. ज्यामध्ये सिद्धार्थ अर्जुन नावाच्या क्रिकेटरची भूमिका करत आहे. चित्रपटाची कथा आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेट सामन्याभोवती फिरते. याचा एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये सिद्धार्थनं क्रिकेटची जर्सी घातली असून स्टेडियम शॉट्सची तयारी करत आहे. मीरा जस्मिन, माधवन आणि नयनताराचे काही ऑन-सेट क्षणही व्हिडिओमध्ये दिसले.
कोणकोणत्या भाषांमझ्ये रिलीज होणार 'टेस्ट'
एस. शशिकांत यांनी यापूर्वी 'विक्रम वेधा', 'इरुधी सूत्रू' आणि 'काव्या थलायवन' या चित्रपटांची निर्मिती केली आहे. परंतु दिग्दर्शक म्हणून त्यांचा हा पहिलाच चित्रपट आहे. तामिळ व्यतिरिक्त, हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्म Netflix वर हिंदी, तेलगू, मल्याळम आणि कन्नड भाषेतही प्रदर्शित होणार आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'शैतान' या चित्रपटात आर. माधवनने खलनायकाच्या भूमिकेत सर्वांची मनं जिंकली आहेत. त्याचबरोबर नयनतारा बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानच्या 'जवान' चित्रपटात दिसली आहे. हा चित्रपट त्याच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :