Tamasha Live : काही महिन्यांपूर्वी बिग बजेट 'तमाशा लाईव्ह' (Tamasha Live) सिनेमाचे पोस्टर आऊट झाले होते. या पोस्टरमधील सोनाली कुलकर्णीचा जबरदस्त लूक बघून अनेकांना उत्सुकता लागून राहिली होती की, हा नक्की कशावर आधारित सिनेमा आहे. आता या सिनेमातील 'चित्रपटाची नांदी' हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. 


भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या जयंतीचे निमित्त साधून हे गाणे भव्यदिव्य स्वरूपात कर्जत येथील एन डी स्टुडिओ येथे प्रदर्शित करण्यात आले. 100 फूट व्यासपीठावर नृत्याचे आद्यदैवत नटराजाला नमन करून 'चित्रपटाची नांदी'ची सुरुवात झाली. या वेळी संजय जाधव, सोनाली कुलकर्णी, सिद्धार्थ जाधव, सचित पाटील, हेमांगी कवी, नागेश भोसले, मृणाल देशपांडे, आयुषी भावे, मनमीत पेम, अमितराज, पंकज पडघन, क्षितीज पटवर्धन यांनी आपल्या मराठी संस्कृतीला साजेसा असा पारंपरिक वेष परिधान करून सिनेमा घडवणाऱ्या सर्व कलाकारांना, तंत्रज्ञांना, एकंदरीच पडद्यामागे मेहनत घेणाऱ्या सर्वांनाच मानाचा मुजरा केला. मराठी सिनेसृष्टीचा अभिमान वाटावा, असा हा सोहळा होता.





प्रेक्षकांच्या तुफान गर्दीत प्रदर्शित झालेल्या या गाण्याला क्षितिज पटवर्धन यांचे बोल लाभले असून पंकज पडघन यांनी संगीत दिले आहे. सिनेसृष्टीतील वेगवेगळ्या विभागात अमूल्य योगदान देणाऱ्या दिग्गजांचा सन्मान या गाण्याच्या माध्यमातून करण्यात आला आहे. या गाण्याची खासियत म्हणजे शौनक अभिषेकी, आनंद भाटे, राहुल देशपांडे आणि अनुराधा कुबेर असे शास्रीय संगीतातील नामवंत गायक यानिमित्ताने एकत्र आले आहेत. त्यामुळे संगीतप्रेमींसाठी हा एक संगीत नजराणाच आहे. हा सिनेमा 24 जून रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. 


संबंधित बातम्या


Maharashtra Shahir : शाहीर साबळेंच्या जीवनावर आधारित 'महाराष्ट्र शाहीर' लवकरच येणार रुपेरी पडद्यावर


Baloch : अपरिचित लढ्याची शौर्यगाथा! प्रवीण तरडेंचा 'बलोच' दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर येणार प्रेक्षकांच्या भेटीला


Mahesh Manjrekar : मराठीतली आजवरची सर्वाधिक बजेटची महाकलाकृती; महेश मांजरेकरांनी केली आगामी सिनेमाची घोषणा