Jhanak Shukla: 'करिश्मा का करिश्मा' (Karishma Kaa Karishma) या मालिकेमध्ये बालकलाकार म्हणून काम करणाऱ्या झनक शुक्लानं तिच्या क्युटनेसनं प्रेक्षकांची मनं जिंकली होती. 'करिश्मा का करिश्मा' या मालिकेमध्ये झनकनं करिश्मा ही भूमिका साकारली होती. झनकनं कल हो ना हो (Kal Ho Naa Ho) या चित्रपटामध्ये देखील काम केले. या चित्रपटात तिनं शाहरुख खानसोबत (Shah Rukh Khan) स्क्रिन शेअर केली. पण त्यानंतर झनक कोणत्याही मालिका किंवा सीरियलमध्ये दिसली नाही. आता झनक ही 26 वर्षाची झाली आहे. आता लवकरच झनक ही तिचा बॉयफ्रेंड स्वप्निल सूर्यवंशीसोबत लग्नबंधनात अडणार आहे. स्वप्निल आणि झनकचा साखरपुडा काही दिवसांपूर्वी पार पडला. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये झनकनं अभिनयक्षेत्र सोडण्याचं कारण सांगितलं आहे.


काय म्हणाली झनक? 


'तू अभिनयक्षेत्र का सोडलं' असा प्रश्न एका मुलाखतीमध्ये झनकला विचारण्यात आला. या प्रश्नाला झनकनं उत्तर दिलं,  'मी मुद्दाम अभिनयक्षेत्र सोडलं नाही. ते आपोआप घडले. मी एक बालकलाकार होते, पण माझ्या आयुष्यात एक असा क्षण आला जेव्हा अभिनयासोबतच अभ्यासावरही लक्ष केंद्रित करायला हवे असे मला  माझ्या आई-वडिलांनी  सांगितले. मी पोस्ट ग्रॅज्युएशन केले पाहिजे,असंही त्यांनी सांगितलं. पण त्यांनी हा निर्णय पूर्णपणे माझ्यावर सोडला. मी माझे शिक्षण पूर्ण केले आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करत असताना माझी अभिनयातील आवड कमी झाली. अभिनयातला माझा इंटरेस्ट संपला आहे.'


'मला पुढे शिक्षण घ्यायचे होते. मी पुरातत्वशास्त्रात शिकले. लॉकडाऊनच्या काळात मी एमबीए केले. आता मी ठरवले आहे की मी शिक्षणासाठी आयर्लंडला जाईन. मी माझे करिअर मार्केटिंगमध्ये करेन. मी जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात जाणार आहे. पण जर मला वेब शोमध्ये चांगल्या कॅरेक्टरची ऑफर आली तर मी ते करण्याचा विचार करेन. मला वेगवेगळ्या क्षेत्रात अनेक गोष्टी करायच्या आहेत. मला पूर्णवेळ अभिनयक्षेत्रात काम करायचे नव्हते.' असंही तिनं पुढे सांगितलं. 






वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 


Entertainment News Live Updates 12 January : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!