Pushpa 2 Thank You Meet : साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जूनच्या पुष्पा 2 ने जगभरात धमाका केला. पुष्पा 2 चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरील अनेक रेकॉर्डब्रेक केले आणि नवीन विक्रम रचले. पुष्पा 2 ने साऊथसह हिंदीमध्येही धमाका केला. जगभरात या चित्रपटाने 1800 कोटींची कमाई केली आहे. इतकंच काय तर ओटीटीवरही हा चित्रपट चांगलाच गाजताना दिसत आहे. पुष्पा 2 च्या यशासाठी अभिनेता अल्लू अर्जूनने चाहत्यांसाठी थँक्यू मीट कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमात त्याने रिलीज डेटबद्दल खुलासा केला आहे.
'छावा'ची रिलीज डेट पुढे ढकलण्यासाठी निर्मात्याला फोन
'पुष्पा 2 : द रुल' चित्रपटाच्याच्या यशासाठी हैदराबादमध्ये थँक्यू मीटचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमात अभिनेता अल्लू अर्जूनने चाहत्यांसोबतच संपूर्ण टीमचे आभार मानले, कारण प्रत्येकाच्या मेहनतीशिवाय हे शक्य झालं नसतं. अल्लू अर्जूनने यावेळी 'पुष्पा'चं पात्र स्क्रीनवर उभं करणारे दिग्दर्शक सुकुमार यांचे आभार मानले आणि चाहत्यांचा प्रेमासाठी आभार मानले. पुष्पा 2 चित्रपट सुपरहिट बनवण्यासाठी त्याने चाहत्यांचे खूप खूप आभार मानले.
'पुष्पा 2'च्या थँक्यू मीटमध्ये अल्लू अर्जूनचा खुलासा
अल्लू अर्जून म्हणाला की, "माझ्यासाठी पुष्पा फक्त एक चित्रपट नाही, तर 5 वर्षांचा प्रवास आहे, एक भावना आहे. मी या चित्रपटाचं यश माझ्या चाहत्यांना समर्पित करतो. तुमचे प्रेम आणि पाठिंब्याशिवाय हे शक्य नव्हतं, त्यासाठी धन्यवाद. माझं वचन आहे की, मी तुम्हाला सर्वांना आणखी अभिमान वाटेल, असं काम करेन."
'छावा'ची रिलीज डेट पुढे ढकलली
या कार्यक्रमात अल्लूने सांगितलं की, बॉक्स ऑफिसवरील टक्कर रोखण्यासाठी त्याने छावा चित्रपटाच्या टीमशी संपर्क साधला होता. अल्लू अर्जुनने सांगितलं की, त्याने पुष्पा 2 साठी बॉलिवूड निर्मात्याला फोन करत त्यांच्या चित्रपटाची तारीख पुढे ढकलण्यास सांगितलं होतं. 'पुष्पा 2' चित्रपट 5 डिसेंबरला प्रदर्शित झाला, तर विकी कौशलचा 'छावा' चित्रपट 6 डिसेंबरला प्रदर्शित होणार होता. या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर टक्कर झाली असती, तर दोघांनाही नुकसान भोगावं लागलं असतं, त्यामुळे 'छावा' चित्रपटाच्या निर्मात्यांनी रिलीज डेट पुढे ढकलली.
अल्लू अर्जुनचा मोठा खुलासा
थँक्यू मीटमध्ये अल्लू अर्जुनने एक मोठा खुलासा केला की, पुष्पा 2 सोबतची टक्कर टाळण्यासाठी त्याने हिंदी चित्रपट निर्मात्यांना रिलीजची तारीख पुढे ढकलण्याची विनंती केली होती. अल्लू अर्जुनने सांगितलं की, "जेव्हा मी एका बॉलीवूड चित्रपट निर्मात्याला फोन केला, जो त्याचा चित्रपट 6 डिसेंबरला प्रदर्शित करणार होता, तेव्हा त्याने तारीख पुढे ढकलली. मी स्वतः त्यांना फोन केला आणि तारीख पुढे ढकलल्याबद्दल त्यांचे आभार मानले. त्यांनी सांगितलं की 'आम्ही सर्व पुष्पाचे चाहते आहोत आणि जर तुम्ही आलात तर आम्ही तुमच्यासाठी मार्ग मोकळा करू'."
पुष्पा 2 चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कामगिरी केली. पुष्पा 2 चित्रपटाने जगभरात 1800 कोटींची कमाई केली आहे. दरम्यान, विकी कौशलचा 'छावा' चित्रपट 14 फेब्रुवारी रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :