Godavari : भारतीय सिनेप्रेक्षकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. 'FIPRESCI-India'च्या पहिल्या दहा भारतीय सिनेमांच्या यादीत 'गोदावरी' (Godavari) सिनेमाला मानांकन मिळाले आहे. अभिनेता जितेंद्र जोशीने (Jitendra Joshi) सोशल मीडियाद्वारे यासंदर्भात माहिती दिली आहे.  


जिओ स्टुडिओजच्या 'गोदावरी' सिनेमाने अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पुरस्कार पटकावले आहेत. जितेंद्र जोशीच्या पोस्टवर अनेक सेलिब्रिटींसह चाहते शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. जितेंद्रने 'गोदावरी' सिनेमाचे पोस्टर शेअर करत लिहिले आहे,"आपल्या सर्वांसाठी अतिशय आनंदाची आणि सन्मानाची बातमी! सन 2021 च्या प्रतिष्ठित 'FIPRESCI-India'च्या पहिल्या दहा भारतीय सिनेमांच्या यादीत गोदावरीला मानांकन मिळाले आहे".





'हे' कलाकार मुख्य भूमिकेत 


जितेंद्र जोशी, विक्रम गोखले, नीना कुळकर्णी, संजय मोने आणि प्रियदर्शन जाधव हे कलाकार 'गोदावरी' सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत. या सिनेमाचे दिग्दर्शन निखिल महाजन यांनी केलं आहे. 


गोदावरी सिनेमाचे कथानक काय?


'गोदावरी' ही निशिकांतची कथा आहे, जो आपल्या कुटुंबापासून दूर झाला आहे. मुळात अस्तित्वात नसलेल्या गोष्टींचा शोध घेण्यासाठी आणि कधीही न तुटलेली नाती सुधारण्यासाठी तो पुन्हा घरी येतो. त्याच्या आयुष्यातील, कुटुंबातील गुंतागुंतीच्या प्रश्नांची उत्तरे त्याला 'त्या' नदीजवळ मिळणार आहेत, ज्या नदीचा त्यानं इतकी वर्षं तिरस्कार केला.


संबंधित बातम्या


BLOG | गोदावरी (2021) : आता नदी सर्वांना दिसेल


Godavari Movie : ऑस्करच्या शर्यतीत मराठीतील 'गोदावरी' सिनेमाचा समावेश, जितेंद्र जोशीला बोर्डात प्रथम आल्याची भावना


Majha Katta : दिग्दर्शक निशिकांत कामत यांच्या निधनानंतर सूचलेला 'गोदावरी' सिनेमा, अभिनेता जितेंद्रसह दिग्दर्शक निखिलने जागवल्या आठवणी