Goa : शास्त्रीय संगीतात रूची ठेवणार्‍यांसाठी ‘स्वस्तिक’गोवा तर्फे डॉ. पं. प्रविण गावकर यांचे शास्त्रीय संगीतावरील रियाजाच्या स्वरयज्ञ’ या तीन दिवसीय निवासी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर 22 ते 24 डिसेंबर 2023 रोजी गोवा येथील साळ मधील राऊत फार्म या निसर्ग रम्य ठिकाणी होणार आहे. वय वर्ष 8 ते 60 वर्षापर्यंत कोणीही या शिबिरात सहभागी होऊ शकतात. देशभरातून संगीतप्रेमी या शिबिरात भाग घेतात. सर्वांना परवडेल अशा वाजवी फी मध्ये सतत 16 वर्षे आयोजित होणारे अशा प्रकारचे हे एकमेव शिबिर आहे.


22 ते 24 डिसेंबर रोजी गोव्यात आयोजन


जास्तीत जास्त नागरिकांनी या संगीत शिबिरात  सहभाग घ्यावा, असे आवाहन प्रसिद्ध गप्पाष्टककार डॉ. संजय उपाध्ये यांनी केले आहे. गेल्या 16 वर्षांपासून सतत सुरू असणारे हे शिबिर आहे. येत्या 22 डिसेंबरपासून या शिबिराची सुरुवात होणार आहे.


तीन दिवसीय शिबिरात खास काय असणार? 


डॉ. संजय उपाघ्ये यांची शास्त्रीय संगीत व भारतीय संस्कृती यावर प्रवचने होणार असून आरोग्य, योग आणि आनंदी जीवन या विषयावर सुद्धा मार्गदर्शन केले जाणार आहे. यामध्ये ग्वाल्हेर घराण्याचे थोर आणि ज्येष्ठ शास्त्रीय गायक पं. लक्ष्मण कृष्णराव पंडित यांच्या मार्गर्गदर्शनाखाली  रियाज होणार आहे. तसेच वैद्य दिवाकरपंत बालावलकर व डॉ. अनुपमा पुरचटकर यांचे ही मार्गदर्शन लाभणार आहे.


भारतीय संस्कृतीची जपवणूक करणारे हे शिबिर आहे. तीन दिवस ज्यांना केवळ शास्त्रीय संगीत ऐकायचे आहे किंवा रियाज करावयाचा आहे त्यांना ही पर्वणीच आहे. या शिबिराला दरवर्ष शेकडो उत्साही नागरिक सहभागी होत असतात. त्यामुळे हे केवळ शास्त्रीय संगीताचे संमेलन आहे असे म्हणू शकतो.