Gehraiyaan Song Beqaaboo : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आणि अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीचा (Siddhant Chaturvedi) आगामी 'गेहरांईया' (Gehraiyaan) सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वीच चर्चेत आहे. दीपिका आणि सिद्धांतच्या बोल्ड सीन्समुळे सिनेमा चर्चेत आला आहे.  या सिनेमातील 'डूबे' (Doobey) हे गाणे प्रेक्षकांच्या पसंतीस पडले होते. आता या सिनेमातील 'बेकाबू' (Beqaaboo) गाणे रिलीज झाले आहे.



'गेहरांईया' सिनेमा रिलीज होण्यास अवघे दोन दिवस उरले आहेत. अशातच आज सिनेमातील 'बेकाबू' गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या गाण्यात सिनेमातील  स्टारकास्ट सहलीला जाताना दिसत आहे. तसेच या गाण्यात अनेक बोल्ड सीन्स दाखवण्यात आले आहेत. याआधीदेखील सिनेमातील 'डूबे' गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. या गाण्यातदेखील अनेक इंटिमेट आणि बोल्ड सीन्स दाखवण्यात आले.





दीपिका पदुकोण, सिद्धांत चतुर्वेदी, अनन्या पांडे (Ananya Panday) आणि धैर्य करवा (Dhairya Karwa) व्यतिरिक्त या चित्रपटात नसीरुद्दीन शाह आणि रजत कपूर यांच्याही सिनेमात महत्त्वाच्या भूमिका आहेत. तसेच या सिनेमाचे दिग्दर्शन शकुन बत्राने केले आहे. या चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमियर 11 फेब्रुवारी 2022 रोजी होणार आहे. 


संबंधित बातम्या


Sam Fernandes : सिनेनिर्माते सॅम फर्नांडिसने आदित्य पांचोली विरोधात केली तक्रार दाखल


सलमानसह अनेक स्टारसोबत काम करणाऱ्या अभिनेत्रीचा भाजपला धक्का, काँग्रेसमध्ये केला प्रवेश 


Munmun Dutta : अनुसूचित जातीवर केलेली टिप्पणी भोवली, 'बबिता जी'ला अटक, चार तासाच्या चौकशीनंतर सुटका


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha