Complaint on Aditya Pancholi: : सिनेनिर्माते सॅम फर्नांडिसने (Sam Fernandes) अभिनेता आदित्य पांचोली (Aditya Pancholi) विरोधात शिवीगाळ आणि मारहाणीचा आरोप करत तक्रार दाखल केली आहे. मारहाण केल्याप्रकरणी मुंबईच्या जुहू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
नेमके प्रकरण काय?
सिनेनिर्माते सॅम फर्नांडिसचा आरोप आहे की, त्यांना आदित्य पांचोलीचा मुलगा सूरज पांचोलीला घेऊन सिनेमा बनवायचा होता. पण या सिनेमासाठी त्यांना कोणीही आर्थिक मदत करण्यास तयार नव्हते. कुणीही फायनान्सर मिळत नव्हता. त्यामुळे 27 जानेवारी रोजी आदित्य पांचोलीने सिने निर्माता सॅमला जुहू येथील सन अँड सन हॉटेलमध्ये भेटण्यासाठी बोलावले. दरम्यान आदित्य पांचोली सॅमला धमकी देत म्हणाला, तुला माझ्या मुलासोबत सिनेमा बनवावा लागेल. नाहीतर मी तुला संपवून टाकेन. यासोबत त्याने शिवीगाळ आणि मारहाणदेखील केली.
डीसीपी मंजुनाथ सिंगे म्हणाले,"या प्रकरणाचा सध्या दोन्ही बाजूने तपास सुरू आहे". दरम्यान आदित्य पांचोलीने या संपूर्ण प्रकरणावर बोलण्यास नकार दिला आहे आहे. आदित्य पांचोलीने एबीपी न्यूजला माहिती देत सांगितले,"उद्या संध्याकाळी मी सिने निर्माता सॅम विरोधात वर्सोवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार आहे". सध्या सॅम फर्नांडिस मुंबईबाहेर आहे.
संबंधित बातम्या
Murabba : मुरांबा मालिकेतील व्यक्तिरेखा का आहे स्पेशल? शशांक केतकर सांगतोय प्रेमाच्या आंबट गोड मुरांब्याची गोष्ट
सलमानसह अनेक स्टारसोबत काम करणाऱ्या अभिनेत्रीचा भाजपला धक्का, काँग्रेसमध्ये केला प्रवेश
कौतुकास्पद! सोनू सूदनं अपघातात जखमी झालेल्या तरूणाची केली मदत, मोठा अनर्थ टळला
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha