Tu Jhoothi Main Makkaar OTT Release : 'तू झूठी मैं मक्कार' (Tu Jhoothi Main Makkaar) हा सिनेमा आता ओटीटीवर रिलीज झाला आहे. 8 मार्च 2023 रोजी हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित झाला. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने चांगलाच गल्ला जमवला. आता सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर हा सिनेमा ओटीटीवर रिलीज झाला आहे. 


'तू झूठी मैं मक्कार' आज ओटीटीवर रिलीज होत असल्याने हा सिनेमा सध्या ट्रेडिंगमध्ये आहे. या सिनेमाचा आज नेटफ्लिक्स (Netflix) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रीमिअर होणार आहे. त्यामुळे आता प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे. या सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. नेटफ्लिक्सने एक खास पोस्ट शेअर करत ओटीटी रिलीजची माहिती दिली आहे. त्यांनी लिहिलं आहे,"खोटं सांगत नाही आहोत... 'तू झूठी मैं मक्कार' हा सिनेमा नेटफ्लिक्सवर 3 मे ला प्रदर्शित होत आहे". 






तगडी स्टारकास्ट असलेला 'तू झूठी मैं मक्कार'!


'तू झूठी मैं मक्कार' या सिनेमात रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) मुख्य भूमिकेत आहेत. रणबीर-श्रद्धासह या सिनेमात बोनी कपूर, डिंपल कपाडीयादेखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. या सिनेमाच्या माध्यमातून रणबीर-श्रद्धा पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. लव रंजनने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. 


लव रंजन दिग्दर्शित 'तू झूठी मैं मक्कार' हा सिनेमा खूपच गाजला. हा विनोदी आणि रोमॅंटिक सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. 95 कोटींच्या बजेटमध्ये या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. रिलीजच्या पहिल्याच दिवशी या सिनेमाने 14 कोटींची कमाई केली होती. या सिनेमाने एकूण 146.6 कोटींची कमाई केली आहे. 


'पठाण'नंतर सकारात्मक प्रतिक्रिया मिळणारा 'तू झूठी मैं मक्कार' हा बॉलिवूडचा पहिलाच सिनेमा आहे. 'पठाण'मुळे 'तू झूठी मैं मक्कार' या सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळेल की नाही, अशी शक्यता वर्तवली जात होती. पण चांगलं कथानक असेल तर त्या सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो हे 'तू झूठी मैं मक्कार' या सिनेमाने पुन्हा सिद्ध केलं आहे. आता ओटीटीवरदेखील या सिनेमाचा सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. 


संबंधित बातम्या


TJMM Box Office Collection Day 16: 'तू झूठी मैं मक्कार'ची बॉक्स ऑफिसवर जादू कायम; जाणून घ्या कलेक्शनबाबत